Download MarathiMati.com's New Android App from Google Play

भिकारीण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० सप्टेंबर २००८

भिकारीण - मराठी कविता | Bhikarin - Marathi Kavita

भिकारीण उभी दारात
होती भीक मागत
थाळ्यात भाकरी पडली
समाधानानं हसली
मलाही भीक हवी होती
मायेची!
कुणाच्या दारात जायचं?
झाडाखाली उभी असलेली ती
चिंध्यानी अंग झाकत होती
अंग उघडं पडतच होतं
मनाच्या चिंध्या झालेली मी
आलिशान बंगल्याच्या लॉनवर
विसावले होते
माझं फाटकं मन कुणला दिसणार?
नवऱ्यानं मारलं म्हणून
ती ओरडत होती
शिव्या देत होती
कपडे वर करून
अंगावरच्या जखमा दाखवत होती
सहानुभूती मिळवत होती
किंमती कपड्यात झाकलेलं
चिंध्या झालेल मन
ठसठसणारी जखम
कुणाला दाखवायाची?

Download MarathiMati.com's New Android App from Google Play