भेट तुझी माझी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २०१५

भेट तुझी माझी - मराठी कविता | Bhet Tujhi Majhi - Marathi Kavita

भेट तुझी माझी जसा तुफान वारा
भेट तुझी माझी जशा थंड थंड गारा

भेट तुझी माझी जसा आनंदाचा पूर
भेट तुझी माझी जसा खर्जातला सूर

भेट तुझी माझी जसा मनातला उत्सव
भेट तुझी माझी जसे स्वप्नातले वास्तव

भेट तुझी माझी जशी जाईची पाकळी
भेट तुझी माझी जशी लोखंडी साखळी

गुलमोहराचे फूल जसे हलकेच अंगावर पडते
तुझ्या माझ्या भेटीत लवलेली प्रत्येक पापणी स्मरते...