पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

भीती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

भीती - मराठी कविता | Bheeti - Marathi Kavita

तुमच्याच आणि माझ्यात
फरक इतकाच की,
तुमच्या दिशेने फणा काढून
एक भीती उभी आहे
आणि माझ्या दिशेने
फक्त तिची सावली.
तुम्ही दचकता
लहानपणी अंगणात लावलेल्या
झाडाच्या अवेळी सावलीला
आणि
आमरस्त्यावरून चालताना
अंगावर येणाऱ्या
ऋतूहीन पावसाला.
माझंअ असं नाही.
तशी एक भीती सरपटत येतेय
माझ्या दिशेनेही.
तरी मी तुमच्यात सामील होणे
कठीण वाटते मला.
सरपटत येणाऱ्या भीतीचा जलाल दंश
तेवढा माझ्या रक्तात भिनण्यापूर्वी
हातातल्या ब्रशनं एवढं चित्र
पुरं करू द्या.
चित्रात तुम्ही असाल उजेडाचे शुभ्र राजपुत्र
आणि मी कवितेतून उडालेल्या पाखरांच्या
पंखाखालचा मिट्ट मिट्ट काळोख.

मग ती ही वही बंद करून
दिवसांच्या रहदारीत बिनघोर सामील होईन.

Book Home in Konkan