MarathiMati.com - Android App on Google Play Store

भगव्या देवदुतांच्या तांड्यात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ नोव्हेंबर २००५

भगव्या देवदुतांच्या तांड्यात - मराठी कविता | Bhagvya Devdutanchya Tandyat - Marathi Kavita

आयुष्याबद्दल माझा अनुमान साक्षात जाणवतोय, ही जाणीव उल्लेखनीय आहे.
वैयक्तिकरित्या मात्र संवेदना गोठवणारी आहे.

‘आयुष्य हे असं असतं तर ?’
‘आयुष्य हे असं असतं तर !’
हाच प्रश्न, हेच उत्तर आहे...

छान आहे-उत्तम आहे..
पण तरीही संवेदना गोठवणारे आहे.
कारणही तसंच आहे,

मी ही आता भगव्या देवदुतांच्या तांड्यात ओढला जातोय..
म्हणजे सामाजिक समतोल ठेवणं जमतयं.

खरं तर हे त्यांचच म्हणणं आहे.

हळू-हळू ‘माणूस मंडळाचा’ कार्यकर्ता होत गेलोय.
आता माझाही सन्मान, नवा गडी नवा राज

मनगटावर लाल धागा, अंगठा वगळता बाकी सर्व बोटे ब्रम्हांडावर नियंत्रण ठेवण्यात व्यस्त,अमावास्या-पौर्णिमा, कमरेला काळा दोरा, मरीआईला नवस, अंगाऱ्याने भरलेल्या ताईताचा गळफास, डोंगर दऱ्यांत कुळाचा शोध घेत..वाटेत पौर्णिमेची आंघोळ, गढुळ पाण्यातच पाप-पुण्यांची खातरजमाई..

अगदी घासुन-पुसुन मी ही आता ‘माणूस मंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता’.

समाजात नाव, तोंडावर स्तुस्ती(सुस्ती+स्तुती), बॅनरवर मोठा फोटो, पांढरा सदरा-काळी विजार, डोळे झाका...डबल मळा

बोला यळकोट-यळकोट जय मल्हार
यळकोट-यळकोट जय मल्हार

MarathiMati.com - Android App on Google Play Store