MarathiMati.com - Android App on Google Play Store

भगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २०१६

भगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले - मराठी कविता | Bhagavya, Hiravya, Nilya Topya Chadhavlele - Marathi Kavita

भगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले
मेंदू पसरलेत सगळीकडे
एक टोपी रंग नसलेली
कुणी माझ्याकडेहि फेका
मला पाऊस खूप लागतोय...

घराघरात पिझ्झा पोचवणारे
तुमची हौस भागवतीलही
ज्वारीचा एखादा दाना
कुणी माझ्या शेतातही फेका
मला भूक खूप लागलीये...

त्या बंद पडलेल्या शाळेच्या जागी
लक्ख उजेडाचा मॉल दिसतोय
गेट वे ऑफ इंडियावर जळणारी एखादी मेणबत्ती
कुणी माझ्या झोपडीतही पेटवा
मला भीती खूप वाटतीये...

इथल्या झोपड्या अन शेती हिसकावून
‘अडानी’ लोकांनी इमले बांधलेत
वाचलेली झोपडी झाकण्यासाठी
एखादं छप्पर माझ्याकडेही फेका
माझी झोपडी खूप खचलीये...

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store