बायको

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ फेब्रुवारी २०१७

बायको - मराठी कविता | Bayko - Marathi Kavita

बायको... बायको... बायको... म्हणजे कोण असते?
एक मुलगी स्वतःचे सर्व काही सोडून अगदी आडनावापासून
ते कधी कधी नाव ही विसरून दुसर्‍यांची होते
कोणा एका व्यक्तीसाठी तिने आपले सर्वस्व सोडून
त्या व्यक्तीच्या परिवाराला आपलं म्हणणं आणि...
आपल्या जन्मापासून असलेल्या नात्यांना विसरावं...

सगळ्यांचं सगळंच करावं आणि स्वभावही सांभाळून घ्यावे
पण तिला कधी काय वाटतं ते सांगू नये
तिने नोकरी करावी, का तर आजकाल सगळेच करतात
पण तिने नोकरी करत घर ही सांभाळावं मग कधी चुकून
चुकी झाली तर तिला स्पष्टपणे सांगावं... तू चुकतेस...
घराकडे लक्ष नाही आहे तुझं...

तरी दुसर्‍याच क्षणी काही झालं नाही म्हणून पुन्हा
नव्या उमेदीने तिने सगळ्यांचं सगळं करावं
आयुष्याच्या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये आपण एकमेकांसाठी आहोत
पण या नात्यांमध्ये ती एकटीच असते... साथीदार मात्र नसतो
वर्षामागे वर्षे जातात पण तिने कधी कोणासाठी कमी पडायचे नाही...

मग ती एक सुन म्हणून... एक बायको म्हणून...
एक वहिनी म्हणून... एक आई म्हणून...
एवढ्या वर्षानंतर आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनवर आलो तरी
ज्याच्यासाठी स्वतःला विसरून त्याची झाले... पण तो विचारतो
तू कोण आहे?... मी आहे म्हणून तू आहेस...
मी नसतो तर तुला कोणी विचारले नसते...
पण तरी त्याचा राग न करता... त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी
त्याला माझी गरज याची जाणीव असणारी... म्हणजे बायको नाही कां?

  • TAG