​​​बावरे प्रेम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मार्च २०१८

​​​बावरे प्रेम - मराठी कविता | Baware Prem - Marathi Kavita

श्रेष्ठत्वाच्या लेखणीने
लिहितोय हि तुझी कविता
कल्पनेच्या पानांवरती
शब्द विसावती रक्ताची सरिता

आठवण तुझी येता मनी
निसर्ग बघ कसा सजला
जवळ नाहीस म्हणून बघ
कसा हिणावतोय मला

हळूच कानात वारा गुपचूप
विचारतोय मला
वेडापिसा झालोय मी
काय करशील तिच्या करिता?

तुझ्या आठवणींची साक्ष देत
उत्तर दिले तडाख त्याला
स्वतःलाही जाळू शकतो
डोळ्यातील तिच्या काजळाकरिता

घुंघरू बनून नाचेलही
सोबत तिची घेण्या करिता
संपूनी टाकेल इथेच स्वतःला
आठवणीत तिच्या राहण्या करिता​

  • TAG