MarathiMati.com - Android App on Google Play Store

बंदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ८ जून २०१५

बंदी - मराठी कविता | Bandi - Marathi Kavita

कोंडलेला आवाज होता
कोंडला होता श्वास
सुगरास जेवणाचाही
उतरत नव्हता घास

दमट चादर गुंडाळून
कुजत होती स्वप्न
धुक्यातून डोकावत होती
अदृश्य असलेली विघ्न

अखडलेल्या अहंकारास होता
शंकांचा साखळदंड
बंद खोलीत स्वत: विरुध्दच
नकळत पुकारले होते बंड

भिंतीपुढे भिंत बांधुनी
विश्वासाला दूर लोटले
डोक्यातील भुग्याला ठिणगी देऊन
नैराश्यास जवळ ओढले

आरशातला रोगट मुखवटा
जेव्हा दारासमोर पडला
फटीतून आलेल्या प्रकाशाने
साक्षात्कार घडवला

बंद दाराच्या कोड्याचे
उत्तर होते कुलुपात
डोळ्यात होता अंधार
पण किल्ली होती खिशात

MarathiMati.com - Android App on Google Play Store