बाबा तंबाखू नका खाऊ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ डिसेंबर २०१७

बाबा तंबाखू नका खाऊ - मराठी कविता | Baba Tambakhu Naka Khau - Marathi Kavita

एक होती मुलगी
तिचे बाबा खायचे तंबाखू
अनेक प्रयत्न करुनही
नाही शकली जिंकू

अरे, ओल्या त्या डोळ्याने
पाहिलं तंबाखूमुळे शेजार्‍याचं मरण
ती एकटी लाडकी तिच्या बाबाला
तिचं कन्यादान हो कोण करणार

भविष्य हे उद्याचं
नाही गेलं तिच्या पाहू
आणि येऊन म्हणते बाबाला
बाबा, तंबाखू नका खाऊ

बाबा घेतो शपथ
मुलीला ह्रदयास घट्ट धरुन
सोडेन सारे व्यसन
पण, नाही जाणार तुला सोडून

  • TAG