अव्यक्त प्रेम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ मार्च २०१७

अव्यक्त प्रेम - मराठी कविता | Avyakta Prem - Marathi Kavita

स्पर्श होताच तुझ्या नयनाचा
कळले मज तुझे प्रतिबिंब

राहील कसा अनभिज्ञ मी
जाहलो हृदयातुनी ओलाचिंब

अंतरीचा जखमी भाव माझा
जरी झालाय तुझ्यात बेधुंद

विवेकाचा जिवंतपणा सांगे
आता बरा नव्हे हा सुगंध

झाला उशीर आता
व्यक्त करण्या तुझे प्रेमबंध

जग तू निवांत आता
नको लिहू खोटा प्रबंध

दिवस गेले निघून सारे
कधी न कळला प्रेमाचा गंध

तु तुझ्यात, मी माझ्यात
स्वतःतच होवु दंग

  • TAG