अस्वस्थ संध्याकाळ

लेखन: |प्रकाशन: संपादक मंडळ| ७ एप्रिल २०१८

अस्वस्थ संध्याकाळ - मराठी कविता | Asvasth Sandhyakal - Marathi Kavita

ही संध्याकाळ अस्वस्थ मनाची, विरहाची, आठवांची
ही संध्याकाळ परतीच्या पाखरांची, डोळ्यातल्या आसवांची

तुझे बोल येता कानी
तुझ्यासाठी गातो गाणी
तुझ्यासाठी वेडापिसा
होऊनिया जातो राणी
अंतरात तगमग मग का नाही व्हायची?
ही संध्याकाळ परतीच्या पाखरांची, डोळ्यातल्या आसवांची

चाललो अवखळ आपण
या व्याकुळल्या संध्याकाळी
हातामध्ये हात होता
तुझा सखे अशावेळी
पापणीतली ओली माया सांग किती जपायची?
ही संध्याकाळ परतीच्या पाखरांची, डोळ्यातल्या आसवांची

क्षितीजात विलीन तर
होणारच होते सारे
का इतका लळा लावूनी
मज बिलगले होते वारे?
वाट तुझी दिनकराने सांग किती पहायची?
ही संध्याकाळ परतीच्या पाखरांची, डोळ्यातल्या आसवांची

  • TAG