आशा हीच सखी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ सप्टेंबर २००८

आशा हीच सखी - मराठी कविता | Asha Heech Sakhi - Marathi Kavita

नको आणू सखया
नैराश्याची सवत
आशा हीच सखी
भान ठेव सतत
बसशी झुल्यावर
जव तू आशेच्या
फुटे रे पालवी
मनी वसंतीच्या
चिंतनाला फुटावा
आशेचा धुमारा
मनमोर नाचेल
फुलवून पिसारा
ग्रीष्माच्या उन्हात
जीव जगे सुखात
सुखस्वप्न पहात
आशेच्या अंगणात
धूसर वलये
प्रतिमा निराशेची
कशाला शिदोरी
बांधू भग्न स्वप्नांची
टाक पाऊल पुढे
सोडून आता खंत
नको आणूस सखया
नैराश्याची सवत