अंतरीचे नेत्र

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ सप्टेंबर २००८

अंतरीचे नेत्र - मराठी कविता | Antariche Netr - Marathi Kavita

अंतरीच्या नेत्रात ग
जीवन निरांजन पाजळे
अनुभवाचे तेल जळे
दुःखासवे सुख होरपळे
अंतरीच्या नेत्राची ग
जाणीव अजाणता जाहली
गतकाळाचे थेंब झाले
पापणी भिजू भिजू राहिली
अंतरीचे नेत्र माझे
भाविष्याचे वेध त्याला
अर्ध मिटल्या नयनीच
पाहती ते जगताला
अंतरीच्या नेत्रास ग
नाही अंधत्व, मोतीबिंदू
नेत्री असे भरलेला
जीवनाचा सकळ सिंधु
अंतरीच्या नेत्राची ग
असावी आठवण जागती
जपते मी अंतरी
हिच मनिषा मनोगती