MarathiMati.com - Android App on Google Play Store

अंगण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ सप्टेंबर २००८

अंगण - मराठी कविता | Angan - Marathi Kavita

खेळायला अंगण दिलंस पण...
मातीवरचा हक्क नाही सोडलास
निसर्गाची आवड असणाऱ्या मला
झाडं लावण्याची मुभा दिलीस पण...
झाडावरची फुलं मात्र तूच वेचलीस
मी लांबूनच घेतला वास...
मातीची ओढ अनावर झाली
तेव्हा सडा शिंपला
रांगोळी घालऱ्याचा बहाणा करत
मातीचा वास घेतला
त्याचवेळी मंद वाऱ्याची झुळुक आली.
मातीत फुलाचा वास मिसळून गेली.
रिक्त ओंजळीत भास झाला फुलांचा
मनानं स्वीकार केला नसलेल्याचा
हे स्वीकाअलंपण तू घेणार नव्हतास
दिलेलं अंगण परत मागणार नव्हतास
याच समाधानानं दिवस काढले
तूच दिलेल्या अंगणात अशी विसावले

MarathiMati.com - Android App on Google Play Store