अंधश्रद्धेच्या जाळ्यात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ मार्च २०१५

अंधश्रद्धेच्या जाळ्यात - मराठी कविता | Andhashraddhechya Jalyat - Marathi Kavita

दगडात भावना नसतांनाही
त्याला देव समजून बसलो

दारी आले जनावर
त्याच्यात सृष्टी समजून बसलो

केस सोडून झुले बाई
तिला देव समजून बसलो

कान फुंकुनी मारी मंतर
त्याला डॉक्टर समजून बसलो

देव कोपेल माझ्यावर म्हणून
बामणाच्या हातून पूजा शांती करून बसलो

होते नव्हते सारे काही
त्याच्या चरणी ठेवून बसलो

होते सारे काही तरी
देव्हार्‍यात आनखी माघीत बसलो

या अंधश्रद्धेच्या जाळ्यात असे मी फसलो
जातीची गाडी सोडून दुसर्‍याच गाडीत बसलो