पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

अनामिक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ एप्रिल २०१७

अनामिक - मराठी कविता | Anamik - Marathi Kavita

कधी हृदयाचे तुकडे गोळा करून, उगीच पाहात बसायचे
कधी काळोखाच्या गाभाऱ्यात, थेट हरवून जायचे
रात्रीच्या चांदण्यांचा विरला आहे प्रकाश
अंधाराचे राज्य खिडकीतून, एकटेच बसून पहायचे

कधी जुन्या पुस्तकांच्या पानात, स्वतःचा भूतकाळ शोधायचा
कधी देव मनातून काढून, नुसताच देव्हाऱ्यात ठेवायचा
कधी कधी आपणुनच वाईट स्वप्ने पहायची
उजेडाच्या जगातही, काळोखी शाल ओढून घ्यायची

सुन्या सुन्या वाळवंटात, चालतंच रहायचं
पावलांच्या खुणा मागे न ठेवता जायचं
अनामिक जसे या जगात येतो आपण
एक दिवस तसंच...

अनामिक निघून जायचं...

  • TAG
Book Home in Konkan