अमृत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ जून २०१५

अमृत - मराठी कविता | Amrut - Marathi Kavita

सुकलेल्या धरणीला
ओलाव्याची फुंकर
हलकेच वितळते पहा
वियोगाचे डोंगर

नजरेत मावेना
रिमझिमणारा आनंद
श्वासासही जाणवला
मोकळेपणाचा सुगंध

खेळते गीत मधुर
हास्याशी लपंडाव
वादळे पार करूनी झाला
मायेचा वर्षाव

हाताच्या रेषेवरी जसा
तुषार तो नाचतो
शीतल वारा कानात माझ्या
खुदकन हासतो

मोहरलेल्या ओंजळीतले
थेंब ओठाने मोजले
ताहानलेल्या पाखराला
मेघाने अमृत पाजले