आकांक्षेच्या छायेत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ मार्च २०१८

आकांक्षेच्या छायेत - मराठी कविता | Akankshechya Chhayet - Marathi Kavita

आवडी निवडीच्या बागेत
इच्छा आकांक्षेच्या छायेत
अपेक्षांच्या वेलीवर फुले फुलतात अनेक
प्रत्येक फुलांची आस करुनी
कळी हि फुलवायची असते
निराशेचे काटे म्हणून
बाग का तोडायची असते?
बाग बहरते सर्व रंगांनी
फुलं हे क्षणभंगुर आकांक्षेच्या छायेत आहे
असो परी गुलाब सुंदर
त्यालाही गळावे लागते
अनगिणत दुःख जीवनात तरी
फुलांची आस सोडायची नसते

  • TAG