पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

आशेचा हिंदोळा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ सप्टेंबर २००८

आशेचा हिंदोळा - मराठी कविता | Aashecha Hindola - Marathi Kavita

आशेचा हिंदोळा
आशेच्या हिंदोळ्यावर बसून
दूरवर बघत बघत
स्वप्न पहाण्याचा
आता कंटाळा आलाय
अंत नाही आशेला
त्यावर बांधलेल्या मनोरथाला
त्या मनोरथानीच
आजवर मला फसवलं
मी वेडी
त्या आशेच्या पंखावर
स्वार झाले
आता समजलं
आशेचे ते पंख
परिस्थितीनं छाटून टाकले
पण वेड्या मनानं
मानलच नाही.
पुन्हा बसले. त्या निर्जीव
आशेच्या झोपाळ्यावर!
बसून बसून कंटाळले!
वाटतं त्या हिंदोळ्याचे दोर
कुणीतरी कापावेत
म्हणजे
मी धपकन आपटेन
वास्तवाच्या जमिनीवर
स्वप्न संपतील
जीवनाचा अर्थ समजेल

Book Home in Konkan