आपलेच वैरी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००८

आपलेच वैरी - मराठी कविता | Aaplech Vairi - Marathi Kavita

शोषितांच्या हाती
कायद्याचे माप
गरीबांची अमाप
हेळसांड

पोटात कपट
ओठात गोडवे
लिहीती भडवे
स्नेहांकित

फक्त मुखातली
एकता - समता
खोटी नीतिमत्ता
माणसांची

आपल्या देशात
आपलेच वैरी
तेच ते पुढारी
जनतेचे

भ्रष्टाचारी वृत्ती
सावळा गोंधळ
पैशाची वर्दळ
खुर्चीसाठी