आनंदाश्रू

लेखन: स्वाती दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ सप्टेंबर २००८

आनंदाश्रू - मराठी कविता | Aanandashru - Marathi Kavita

तु जाशील तुझ्या घरी
आम्ही असु आमुच्या दारी
तु कवटाळशील स्वप्नांना उरी
तु राहशील आनंदात
नव्या सुखस्वप्नात रममाण
आम्ही मात्र राहु विरहात
स्वप्न भंगण्याच्या दुःखात

जायचं होतच सोडून
जुनी नाती तोडून
मग प्रेम का केलसं भरभरुन

अंग अंगाखांद्यावर लोळलीस
मित्र मैत्रिणीत खेळलीस
जोडीदार मिळताच सार विसरलीस

आमच्याप्रमाणे काळजावर दगड ठेव
आम्हीही तुझ्या आठवणीलाच कवटाळू उरी
तुला सोबत करेल आमच्या प्रेमाची शिदोरी
पण तुला जावचं लागेल आमच्यापासून दूरी
तरीही माहेर - सासरला बांधून ठेव घट्ट दोरी
बांधून ठेव घट्ट दोरी...