Download MarathiMati.com's New Android App from Google Play

आजी हरवली आहे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ ऑगस्ट २०१७

आजी हरवली आहे - मराठी कविता | Aaji Haravali Aahe - Marathi Kavita

वाकून पाठीत, सहारा काठीत घेऊन
आजी कुठे फिरायला गेली आहे ?
शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे

बाबा म्हणे त्याची आजी
त्याला छान - छान गोष्टी सांगायची
पण बाबा, फक्त गोष्टी सांगण्या पुरती मी
आजी कुठून आणायची ?
मला आता छान - छान गोष्ट आहे ऐकायची

शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे

सुट्टीत बाबा नेतच नाही गावी
म्हणे तिकडे आता आपलं कोण आहे
घर आलोय सोडून आपण
आपलं तिकडं जाणे आता अयोग्य आहे
पणा आजी म्हणत होती की काळजी माझं
त्यानं तोडून नेलं आहे

शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे

आठवतंय मला जेव्हा आजी
पैसे नसतानाही मला रोज खाऊ
खेळणी आणून द्यायची
वाटायचं मला जगात ती
एकटीच श्रीमंत असायची

घरात आली छोटी दीदी
तिची न्हाऊ, मालिशची
जिम्मेदारी वाढली आहे
ऐकलं आहे आता आजीची ती जागा
कोणत्यातरी मावशीने घेतली आहे

शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे

परिक्षेच्या निबंध लेखनाच्या
पर्याया मधूनही
माझी आजी वजा होत आहे
पण मला पाठीवर घेऊन घरभर मिरवणारी
आजी मला हवी आहे

शोधून द्या मला माझी आजी
माझी आजी हरवली आहे
माझी आजी हरवली आहे

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play