Download MarathiMati.com's New Android App from Google Play

आज इथे पावलोपावली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ सप्टेंबर २००८

आज इथे पावलोपावली - मराठी कविता | Aaj Ithe Pavlopavali - Marathi Kavita

आज इथे पावलोपावली
माणसांमाणसातही फूट आहे
माणसात माणसांची लूट आहे

आज इथे पावलोपावली
माणसाला मरण जपावं लागतं
कुणासाठी कुणालातरी खपावं
लागतं

आज इथे पावलोपावली
कुणी कुणाला बुडवतो आहे
कुणी कुणाला रडवतो आहे

आज इथे पावलोपावली
जो ज्याला घडवतो आहे
तोच त्याला बडवतो आहे

Download MarathiMati.com's New Android App from Google Play