Download MarathiMati.com's New Android App from Google Play

आई असं नाव ठेवलं कोणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ ऑगस्ट २०१७

आई असं नाव ठेवलं कोणी - मराठी कविता | Aai Asa Naav Thevala Koni - Marathi Kavita

आई तुझं ‘आई’ असं नाव ठेवलं कोणी ?
नाही अपेक्षा, नाही तक्रार
असं वागायला शिकवतं का गं तुला कोणी ?

पोटभर जेवायला देते तू सगळ्यांना
स्वतःसाठी मात्र शिळेच असते तुझ्या ताटात
आई माझी माय माझी तुझी महिमा किती छान गं
कवियात्रींना पण दिसे तू दुधावरची साय गं

घरात आल्या पाहूण्यांना नेसवते साडी छान ग
पदर तुझा पण फाटका, तुला दिसत कसं न्हाय गं
माझं बाळ, माझा शोन्या दिवस रात्र बोलत राहतेस
थकत कशी न्हाय गं ?
समुद्रा एवढे प्रेम देतेस तुला मिळते तरी काय गं ?

आई तुझं ‘आई’ असं नाव ठेवलं कोणी ?
नाही अपेक्षा, नाही तक्रार
असं वागायला शिकवतं का गं तुला कोणी ?

  • TAG
Download MarathiMati.com's New Android App from Google Play