MarathiMati.com - Android App on Google Play Store

आधार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ फेब्रुवारी २०१७

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आता राहिलेत कुठे खांदे
हातपण झालेत पोरके
भरभरुन रडायचंय आता
पण डोळेच पडलेत कोरडे

पाठीवर पडणारी शाबासकी
आजकाल हरवून गेलीय
कुणाला बोलावं काय?
इथे माणुसकीच मरुन गेलीय

मरेपर्यंत जगायचं की
मरत मरत जगायचं
आता आपलं आपणच ठरवायचं
किती आणि कसं जगायचं

आता भरलंय सगळंच
वाईटाच्या माठात काठोकाठ
क्षणिक सुखाच्या मागून
यातनाही येतात पाठोपाठ

रडणारे डोळे पुसायला आता
रुमाल नकोत हात हवेत
कुणीतरी येऊन आता
आधाराचे खांदे द्यावेत

  • TAG
MarathiMati.com - Android App on Google Play Store