विश्वासघात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१५

विश्वासघात - मराठी कथा | Vishwasghaat - Marathi Katha

राज जसा ऑफिसला पोहोचला तसा त्याने सुनीलला झालेला सगळा प्रकार सांगितला तो ऐकुन त्याला मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ‘ये तो बस शुरवात हैं आगे आगे देख होता है क्या’

कविता आवरुन ऑफिसला गेली तिचा दिवस ठीक ठाक गेला. राज जसा ऑफिसला पोहोचला तसा त्याने सुनीलला झालेला सगळा प्रकार सांगितला तो ऐकुन त्याला मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ‘ये तो बस शुरवात हैं आगे आगे देख होता है क्या’ असे मनात म्हणत त्याने राजला कविताला वेड लागले असावे असे सांगितले आणि अजुन काही विपरित घडण्याआधी तिला सोडुन दे असे सुचवले. दुपारी पहिला घास तोंडात घालताच राजच्या तोंडाची होळी झाली त्याने नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की भाजीत खुप जास्त मिरचीपुड टाकली होती, हे काम कविताचेच असावे अशी त्याची खात्री पटली. बिचारा दिवसभर उपाशीच राहिला. संध्याकाळची मानसोपचार तज्ञाची भेट घेऊन त्याने सर्व वृत्तांत त्यांना कथन केला. त्यांनी शरीर संबंधांचा अभाव हे कविताच्या अशा विचित्र वागण्यामागचे कारण असावे असा निश्कर्ष काढला व राजला थोडे प्रेमाने आणि समजुतीने घ्यायला सांगितले. कविताला आवडणारे मोगऱ्याचे गजरे आणि काजुकतली घेऊन तो घरी आला. कविता किचन मधे जेवण बनवत होती. डायनिंग टेबलवर हातातील पिशवी ठेऊन तिला सरप्राइज द्यावे असा विचार करुन तो कपडे बदलण्यासाठी बेडरूम मध्ये गेला तर त्याच्या सर्व कपड्यांवर कुंकु टाकलेले त्याला दिसले. एक शर्ट त्याने हातात घेतला तर कात्रीने त्याच्या चिंध्या केलेल्या दिसताच त्याचा रोमॅंटिक मुड नाहीसा झाला आणि कविताला जाब विचारायला तो तणतणत किचन मधे गेला आणि समोरचे दृश्य पाहुन त्याचे पाय दारातच खिळले. त्याने आणलेले मोगऱ्याचे गजरे पुर्ण किचन भर पसरले होते आणि किचनच्या एका कोपऱ्यात कविता केस पिंजारलेल्या अवस्थेत मांसाचे लचके तोडावे तसे पॅकेट न फोड़ताच कागदासकट काजु कतलीच्या पॅकेटचे लचके तोडुन खात होती. राज दरवाज्यात येताच ती खायची थांबली आणि गरकन वळुन तिने राजकडे पाहीले सकाळ सारखीच तिची भयाण नजर राजच्या काळजाचा थरकाप उडवून गेली. राजच्या हातातील चिंध्या झालेला शर्ट गळुन पडला. तो तसाच धावत घराबाहेर पडला आणि त्याने सुनीलला फोन लावला. त्यावेळी सुनील बार मध्ये दारु पित बसला होता. त्याने आपण बार मध्ये असुन आजची रात्र घरी न जाता एखाद्या मित्राकडे काढण्यास राजला सांगितले. इकडे सुनीलवर दारुचा अंमल पुरता चढला होता, त्यात कविता विषयीची त्याची वासना उफाळून आली. आता त्याला कविता खेरीज काहीच सुचेनासे झाले. तो हेही विसरला की कविताला पिशाच्चाने पछाडले आहे. रिक्षा पकडुन तो तडक राजच्या घरी निघाला.

समोरच्या उघड्या गॅलरीतुन सुनीलचे कलेवर तिने एखादा कागदाचा बोळा भिरकवावा तितक्या सहजतेने भिरकावून दिले. सुनीलचे प्रेत शंभर एक फुट दूर, रस्त्यावरून सुसाट चाललेल्या एका लोडेड कंटेनर खाली आले आणि त्याचा चेंदामेंदा झाला.

राजच्या घराची बेल त्याने वाजवली तसे कविताने दार उघडले. दार उघडताच तो कवितावर तुटून पडला. त्याला दाराबाहेर लोटत ती स्वतःची सुटका करू पाहात होती पण लाथेने दरवाजा ढकलुन वासनेच्या चिखलात बरबटलेला तो डुक्कर मुसंडी मारून आत आला. कविताला जमिनीवर आडवे पाडून तो तिच्यावर झुकला तसा कविताचा अवतारच बदलून गेला अचानक तिच्या शरीरात त्या पिशाच्चाने प्रवेश केला. आपल्या सावजाला कोणी दूसरा पुरुष काबिज करायचा प्रयत्न करतोय हे त्या पिशाच्चाला सहन झाले नाही. कविताने उजवा पाय सुनीलच्या पोटात दाबला त्याचे दोन्ही हात हातात धरून जोर लाऊन सुनीलला डोक्यावरून पुढे फेकुन दिले. सुनील फुटबॉल सारखा उडुन जाऊन समोरच्या भिंतीवर आदळला. त्याच्या डोक्याला आणि खांद्याला सपाटुन मार लागला होता. अपमानाने आणि बदल्याच्या विचाराने पेटुन उठलेल्या सुनीलने पुन्हा तिच्यावर हल्ला केला तेव्हा तिने दोन हातात त्याची मान अशी काही पिरगळली की ती पुर्णपणे उलटी फिरली. सुनीलचा खेळ संपला होता. समोरच्या उघड्या गॅलरीतुन सुनीलचे कलेवर तिने एखादा कागदाचा बोळा भिरकवावा तितक्या सहजतेने भिरकावून दिले. सुनीलचे प्रेत शंभर एक फुट दूर, रस्त्यावरून सुसाट चाललेल्या एका लोडेड कंटेनर खाली आले आणि त्याचा चेंदामेंदा झाला. ड्रायव्हरला क्षणभर काही कळलेच नाही. दारुच्या नशेत कंटेनर दामटत तो तसाच सुसाट निघुन गेला. सुनील कुत्र्याच्या मौतीने मेला होता, अगदी कोणाच्याही नकळत! प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे इतर ट्रक व मोठ्या गाड्या त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवत निघुन गेल्या. थोड्याच वेळात त्याच्या शरीराचा मागमुसही उरला नव्हता.

राजने दुपारीच सगळा प्रकार वडीलांच्या कानावर घातल्याने ते तातडीने शहराकडे रवाना झाले. त्यांनी गावच्या मांत्रिकाला पण सोबत घेतले होते. फोन करुन राजला त्यांनी बसस्टॅंड वर बोलावून घेतले. तिथुन तिघंही राजच्या घरी आले. काही झालेच नाही अशा अविर्भावात कविताने दरवाजा उघडत त्यांचे स्वागत केले. भीतभीतच राज सर्व प्रथम आत आला, पाठोपाठ त्याचे वडील आले पण मांत्रिक दारातच थबकला. त्याला काहीतरी अमानवीय अस्तित्व त्या घरात असल्याचे जाणवले होते. मांत्रिकाला पाहाताच कविताच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य गायब झाले आणि त्याची जागा द्वेषाने घेतली. मांत्रिकावर जळजळीत नजर टाकत ती मोठ्याने पुरुषी आवाजात ओरडली, ‘ये क्यु आया है यहाँ? अभी लौट जाओ नहीं तो पछताओगे’ आणि भेसुर हसु लागली. मांत्रिकाने आपल्या झोळीतील विभुति काढून तिच्या कपाळावर लावताच ती किंचाळत आत पळाली. हा प्रकार राज आणि त्याचे वडील थिजल्यासारखे पाहात होते. मांत्रिकाने डोळे बंद करुन समाधी लावताच त्याला सर्व प्रकार समजला. त्याने कविता वर एका अघोऱ्याने सुनीलच्या सांगण्यावरून राजला त्रास देण्यासाठी एक भयानक पिशाच्च सोडले असुन तिला वाचवण्यासाठी एक अनुष्ठान करावे लागेल असे सांगितले.