विश्वासघात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१५

विश्वासघात - मराठी कथा | Vishwasghaat - Marathi Katha

त्याने झोपडीत वाकुन पाहिले तर सर्वांगावर चिताभस्म चोपडलेला एक अजस्त्र अघोरी साधु जमिनीवर नग्नावस्थेत बसुन काही तरी खात होता. नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की तो एका माणसाचा हात होता कदाचित बाजुच्या स्मशानात जळत असलेल्या चितेतून त्या अघोऱ्याने तो तोडुन आणला होता.

त्याने झोपडीत वाकुन पाहिले तर सर्वांगावर चिताभस्म चोपडलेला एक अजस्त्र अघोरी साधु जमिनीवर नग्नावस्थेत बसुन काही तरी खात होता. नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की तो एका माणसाचा हात होता कदाचित बाजुच्या स्मशानात जळत असलेल्या चितेतून त्या अघोऱ्याने तो तोडुन आणला होता. भाजलेल्या मांसाच्या दुर्गंधीने सुनीलला ढवळून आले तो झोपडीतून बाहेर जाणार इतक्यात त्या अघोऱ्याने त्याच्याकडे वळुन पाहिले आणि ओरडला, जय काली! त्याचे डोळे म्हणजे जणू धगधगते अंगार होते. त्याचे ते भयाण रूप पाहुन सुनील तिथुन पळुन जायच्या बेतात होता पण त्या अघोऱ्याने त्याला आत बोलावले. म्हणाला, “तु अपने दोस्त की स्त्री को पाना चाहता है ना? मैं तुम्हारी मदत करूँगा लेकीन तुम्हे मेरे लिये एक कुंवारी कन्या लानी होगी जिसकी बली चढ़ाकर मैं और भी शक्तिशाली बन जाऊँगा। मैं तुम्हे एक वशीकरण मन्त्र बताऊंगा; जिसके इस्तमालसे तुम्हे वो स्त्री वश हो जायेगी उसके बाद आनेवाली पुरणमासी को तुम्हे मेरे लिए एक कुंवारी कन्या का इंतजाम करना होगा। मंजुर है तो बोलो!” हे ऐकताच सुनीलने थोडा विचार करुन त्या अघोऱ्याला वचन दिले. मग अघोरऱ्याने त्याला आपल्या झोपडीत बसवुन वशीकरण विधी समजावून सांगितला.

‘कामाख्‍या देश कामाख्‍या देवी,
जहॉं बसे इस्‍माइल जोगी,
इस्‍माइल जोगी ने लगाई फुलवारी,
फूल तोडे लोना चमारी,
जो इस फूल को सूँघे बास,
तिस का मन रहे हमारे पास,
महल छोड़े, घर छोड़े, आँगन छोड़े,
लोक कुटुम्‍ब की लाज छोड़े,
दुआई लोना चमारी की,
धनवन्‍तरि की दुहाई फिरै’।

“किसी भी शनिवार से शुरू करके ३१ दिनों तक नित्‍य ११४४ बार इस मंत्र का जाप करें तथा लोबान, दीप और शराब रखें, फिर किसी फूल को ५० बार अभिमंत्रित करके स्‍त्री को दे दें। वह उस फूल को सूँघते ही वश में हो जाएगी”।

सुनीलने सर्व विधी समजुन घेतला आणि घरी परतला. ती रात्र कविताचा कशा कशा प्रकारे उपभोग घ्यायचा या विचारात त्याने जागुन काढली. येणाऱ्या शनिवारी त्याने वशीकरण विधीस प्रारंभ केला पण मुळच्या चंचल स्वभावाच्या सुनीलसाठी ती साधना करणे केवळ अशक्य होते. पन्नास एक वेळा मंत्रजाप झाल्यावर लगेचच त्याचे ध्यान भटकु लागले. समोर कविता दिसू लागली, तिच्या विषयीच्या वासनेच्या विकारात बरबटलेले त्याचे मन त्याला स्वस्थ बसु देईना. शेवटी हे जप वगैरे आपले काम नाही हे उमजुन तो त्या अघोऱ्याकडे परत आला. अघोरी त्याच्याकड़े तुच्छतेने पाहात भयाकारी हसला. “एक दिन भी जाप नही कर पाए और तुम्हे भोगने के लिए स्त्री चाहिए? मुझे पहलेही समझ लेना चाहिये था की तुम जैसे वासनांध व्यक्तिसे जप तप जैसा कोईभी कार्य होना कदापी संभव नही। चला जा यहाँ से वरना तुझेही बली चढ़ाऊँगा”। ते ऐकताच सुनीलने त्या अघोऱ्याचे पाय धरले व मदतीसाठी विनवले तेव्हा तो अघोरी म्हणाला की, “जिस स्त्री की तुम्हे लालसा हैं वो इतनी आसानीसे तुम्हारे हाथ नही लगेगी तुम्हे उसे अपने पतीसे दूर करना होगा और उसके बादही तुम उसे तुम्हारे पास आने के लिए विवश कर पाओगे”। “लेकीन ये कैसे संभव है महाराज? मैंने हर मुमकिन कोशिश करके देख ली पर कोई फायदा नही हुवा”। सुनीलने असे म्हणताच तो अघोरी त्याला म्हणाला, “वो तुम जैसे तुच्छ इंसान के बसकी बात नही हैं। उसके लिये हमें किसी अमानवी ताकद की सहायता लेनी होगी। आओ मेरे साथ”। असे म्हणुन तो सुनीलला घेऊन झोपडीसमोरील झाडाजवळ आला आणि दारुमध्ये दोन बोटे बुडवून ती त्याने दोन्ही डोळ्यांना लावली नंतर स्वतः जवळील भस्म चिमटीत धरून तो काही मंत्र म्हणु लागला.