सात दिवस आणि सहा रात्री भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ मे २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ५ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 5 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ५

दिवस उजाडतो. अजिंक्य, विवेक, किरण, नेहा हे चारही जण आपापले सामान, बॅगा जीप मध्ये ठेवत असतात. तेवढ्यात प्रार्थना खाली येते. तिला सुखरूप पाहून ते सर्व आनंदित होतात. प्रार्थना धावत येऊन अजिंक्यला मिठी मारते. तिच्या डोळ्यातून अश्रू तराळत असतात. ती अजिंक्यला ‘आय अ‍ॅम सॉरी’ असे म्हणते. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला. यावर अजिंक्य प्रार्थनाला म्हणतो, “प्रार्थना ‘जस्ट फर्गेट इट’ हा क्षण आपल्या आयुष्यात येणार होता. आपण सर्व त्यातून बाहेर पडलो. हेच आपले नशीब म्हणावे लागेल.” ते तिघेही या गोष्टीशी सहमत असतात. किरण आता त्यांना म्हणतो,
“बरं, चला आता. आपले आई - वडील वाट पाहत असतील. आपण त्यांना ‘सात दिवस सहा रात्रींची’ ट्रिप सांगून आलो होतो व आता आठ दिवस झाले आहेत. आपल्या ट्रिपचे दिवस कसे गेले ते कळलेच नाही.” किरणच्या बोलण्यावर विवेक त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो व त्याला म्हणतो,
‘तुझ्यासाठी व्हिडिओ शुटींग केले आहे. दाखवू का?’ किरण यावर म्हणतो, ‘नको रे बाबा ! आता मी पुन्हा या साईडला कधी येणार नाही.’ त्याच्या या बोलण्यावर ते सर्व हसू लागतात व तिथून नाशिकला आपल्या घरी जायला निघतात. वाटेत त्यांना समोर राजेश उभा राहिलेला दिसतो. अजिंक्य आपली जीप थांबवतो. राजेश त्यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणतो,
“मित्रांनो तुमच्यामुळे मला नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. मी तुमच्या सोबत येऊ शकतो का?” त्याच्या या प्रश्नावर ते सर्वजण खूप आनंदित होतात व राजेशलाही आपल्या सोबत घेऊन परतीच्या प्रवासाला सुरूवात करतात.


सात दिवस आणि सहा रात्री - कथेचे सर्व भाग