सात दिवस आणि सहा रात्री भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ मे २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ५ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 5 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ५

ती एक्झॉर्सिजमला दाद देत नाही. प्रार्थना एक मोठी किंचाळी फोडते व गुडघ्यावर पडते. ही प्रेरणाच्या आत्म्याची एक चाल असते. ती प्रार्थनाच्या आवाजात केविलवाणी विनंती करते,
“अजिंक्य, मला वाचव या सगळ्यातून. प्लीज अजिंक्य सेव्ह मी.” अजिंक्य थोडा भावूक होतो. आता प्रेरणा प्रार्थनाच्या शरीरास इजा पोहचवू लागते. तिच्या शरीरावर अनेक जखमा होतात. अजिंक्यला प्रार्थनाची ही अवस्था सहन होत नाही. तो अचानक तिच्या जवळ जातो. प्रेरणाला हेच हवे असते. ती अजिंक्यचा गळा धरते. अजिंक्य हवेत उचलला जातो. हे पाहून राजेश व अजिंक्यच्या मित्रांची घाबरगुंडी उडते. आता फादर थॉमस वेळ न दवडता प्रार्थनाच्या जवळ जाऊ लागतात.