सात दिवस आणि सहा रात्री भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ मे २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ५ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 5 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ५

अजिंक्य प्रेरणाच्या आत्म्याला भुलवून ठरलेल्या जागी घेऊन येतो. तिथे ‘एक्झॉर्सिजमची’ सगळी व्यवस्था करून ठेवलेली असते. फादर थॉमस सोबत तिथे राजेश, नेहा, विवेक व किरण हे देखील असतात. अजिंक्य प्रार्थनाला ती जागा दाखवित असतो. पण प्रार्थनाला त्यात इंटरेस्ट नसतो. ती अजिंक्यचा हात धरून आपल्याकडे खेचते व त्याचे तिथे चुंबन घ्यायला लागते. अजिंक्य फादर थॉमस यांच्या इशार्‍याची वाट पाहत असतो. त्याचवेळी फादर थॉमस त्याला इशारा करतात व अजिंक्य प्रार्थनाला जोरदार धक्का देतो. प्रार्थना त्या मोकळ्या जागेत येऊन कोसळते. आजूबाजूंच्या झाडांवर क्रॉसची प्रतिमा लावलेली असते. त्या प्रतिमेतून येणारी उर्जा प्रार्थनाला सहन होत नाही. ती मोठ्याने ओरडू लागते. पण कोणीही तिच्या मदतीला जायचे नाही असे फादर थॉमस यांनी सर्वांना सांगितले असते. प्रार्थनाची ही अवस्था पाहून अजिंक्य व त्याच्या मित्रांना फार वाईट वाटते. पण ती एक हिंस्त्र व दृष्ट आत्मा असते.