सात दिवस आणि सहा रात्री भाग ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ मे २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ५ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 5 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ५

सात दिवस आणि सहा रात्री भाग १ या कथेचा भाग ५

प्रार्थनाला तिच्या मित्रांचा, ती स्वतः कोण आहे या सगळ्याचा विसर पडलेला असतो. ती आता फक्त शरीररूपी प्रार्थना राहिलेली असते. तिच्या मनावर, मेंदुवर प्रेरणाच्या आत्म्याचा अंकुश असतो. अजिंक्य भानावर येतो व तिला म्हणतो,
“प्रार्थना, आता आपण इथेच राहणार आहोत.”
प्रार्थना म्हणते,
“रियली!”
अजिंक्य म्हणतो,
“येस...! मी आपल्या फ्लॅटसाठी जागाही पाहिली आहे. चल तुलाही दाखवितो.” त्याबरोबर ते दोघेही लॉजच्या बाहेर पडतात.