सात दिवस आणि सहा रात्री भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ एप्रिल २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ४ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 4 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ४

“आता ती तुमच्या मैत्रिणीच्या शरीराचा वापर करून स्वतःची अतृप्त कामेच्छा पूर्ण करून घेत आहे व हे असेच सुरू राहिले तर एकदिवस तुम्हा दोघांचा मृत्यू देखील होवू शकतो. ती एक अतृप्त आत्मा आहे. तुमच्या दोघांचा ती खेळण्यासारखा वापर स्वतःच्या शरीराची भूक भागवत आहे. तुम्ही मेलात तरी तिला काही फरक पडणार नाही ती दुसरे शरीर शोधायला रिकामी आहे.”० हा सर्व प्रकार ऐकून ते चौघेही एकदम शॉक होतात. त्यांची फार घाबरगुंडी उडते. कारण हे सर्व त्यांच्या दृष्टीने नवीन असते. तेवढ्यात त्या चर्चचे ‘फादर ’आपल्या अनुयायांसह तिथे येतात. राजेश फादर थॉमस यांना घडलेली सर्व घटना सांगतो व त्यांना हात जोडून विनंती करतो कि या भयानक परिस्थितीतून आमच्या सर्वांचे रक्षण करा. फादर त्या सर्वांना अभय देतात व म्हणतात, “ईश्वरपुढे अशा सर्व शक्तींचा नाश होतो. पण त्या शक्तीशी आपल्याला लढले तरी पाहिजेच अशा शक्तींना जेरबंद करण्याचा एक उपाय आहे. तो म्हणजे ‘एक्झॉर्सिजम’(Exorcism).

फादर त्या सर्वांना एक्झॉर्सिजमची माहिती देतात व त्यांच्या सांगण्यावरून पुढचा प्लान ठरतो. आता अजिंक्य एकटाच आपल्या रूमवर जातो. भेदरलेल्या अवस्थेत रूमचे दार उघडतो. तेव्हा प्रार्थना बिछान्यावर एका सेक्सी अवस्थेत पडलेली असते. तिच्या हातात अजिंक्यचा फोटो असतो. ती त्या फोटोवरून हात फिरवित स्माईल करत असते. दारात अजिंक्य आलेला पाहून ती ताडकन उभी राहते व त्याला म्हणते, “अजिंक्य, कुठे गेला होतास तू मला एकटीला सोडून?” तेव्हा अजिंक्यला फादर थॉमस यांचे बोल आठवतात अजिंक्यने प्रार्थनाशी तिला आवडेल अशा प्रेमळ गोड भाषेत बोलून तिला विश्वास द्यायला हवा कि ती जे म्हणेल ते तो करायला तयार आहे व अशातच त्याने तिला एक्झॉर्सिजमच्या ठरलेल्या जागेत आणायचे. ती जागा लॉजच्या ठिकाणापासून थोडे दूर आजूबजूला चार - पाच वृक्ष व मधोमध मोकळी जागा त्या मोकळ्या जागेत प्रार्थनाला आणायचे असते. अजिंक्य हे सर्व आठवत असताना प्रार्थना त्याच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवते व म्हणते, ‘हे, कुठे हरवला आहेस?’ असे म्हणून त्याच्यासोबत प्रणय करू लागते.


सात दिवस आणि सहा रात्री - कथेचे सर्व भाग