सात दिवस आणि सहा रात्री भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ एप्रिल २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ४ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 4 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ४

अजिंक्य बिचारा तळमळत उठतो व तीला म्हणतो, “ए प्लीज, माझ्या प्रार्थनाला काही करू नको! मी तू सांगेल ते करायला तयार आहे.” हे ऐकून ती आत्मा फार खूष होते आणि अजिंक्यसोबत खूप वेळ प्रणय करते. इकडे त्याच्या मित्रांना अजिंक्यची काळजी लागते. कारण अजिंक्य सोबत प्रार्थना जेव्हा रूमवर जात असते तेव्हा तिच्या चेहर्‍यावरील असुरी आनंद नेहाने टिपलेला असतो. अजिंक्यच्या शरीराचा पुरेपुर वापर करून झाल्यानंतर ती आत्मा आता गाढ झोपी जाते, या संधीचा फायदा घेऊन अजिंक्य तिथून अर्धमेल्या अवस्थेत बाहेर पडतो. ते थेट आपल्या मित्रांकडे जातो. आपल्या मित्रांना पाहून त्याला रडू कोसळते. अजिंक्यला त्याचे मित्र धीर देतात. तो आपल्या मित्रांना कळवळलेल्या सुरात म्हणतो, “मला वाचवा! ती कोण दुसरीच आहे.”

आता अजिंक्यला नेहा जे बोलत होती ते खरे आहे हे कळून चुकलेले असते. आपल्या मित्रांना अजिंक्य घडलेला सर्व प्रसंग सांगतो. ते ऐकून त्याचे मित्र हबकतात व अजिंक्यला घेऊन लॉजच्या बाहेर पडतात. सर्वांना एकच प्रश्न पडलेला असतो कि हे सर्व काय घडत आहे? ती आत्मा आहे कोण? अजिंक्य तर पुरता हादरलेला असतो. ते सर्वजण खूप टेंशनमध्ये असतात. तेवढ्यात त्यांना पाठीमागून एक आवाज ऎकू येतो. “मला या प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत.” अचानक आलेल्या आवाजामुळे ते सर्व मागे पाहतात. तर मागे तो तरूण उभा असतो. ज्याला येथील लोक ‘वेडसर’ समजत असतात. त्याचे नाव ‘राजेश’ असते. तो वेडा नसून त्या बरोबर एक ‘भयानक प्रसंग’ घडलेला असतो व त्यामुळेच राजेशची अशी अवस्था झालेली असते. अजिंक्यची प्रश्न विचारण्याची उद्वीगता पाहून राजेश त्यांना म्हणतो, “आपण या गोष्टीवर इथे नको बोलायला हवे. इथे आपल्याला धोका आहे. येथून जवळच्या अंतरावर एक चर्च आहे. आपण तिथे जाऊया.”