सात दिवस आणि सहा रात्री भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ एप्रिल २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ४ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 4 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ४

सात दिवस आणि सहा रात्री भाग १ या कथेचा भाग ४

नेहाला मात्र तिचा जरा संशय येतो. विवेक अजिंक्यला म्हणतो, “अजिंक्य, तू प्रार्थनाला घेऊन रूमवर जा. आम्ही येतो लगेच.” अजिंक्य प्रार्थनाला दोन्ही हातांनी उचलून वर रूमकडे घेवून जातो. तो तिला पलंगावर अलगद झोपवतो व तिथून जात असताना अचानक प्रार्थना त्याचा हात धरते व त्याला आपल्याकडे खेचून घेते आणि त्याच्याशी प्रणय करायला लागते. अजिंक्यला आता याचा फार कंटाळा आलेला असतो. तो प्रार्थनाला आपल्या पासून दूर करतो आणि रागवून म्हणतो.

“ए प्रार्थना, मी खूप थकलोय यार. प्लीज आता नको. तू अचानक अशी का वागू लागली आहेस.” अजिंक्यच्या या नकारावर प्रार्थनाच्या शरीरात असलेली ती अतृप्त आत्मा फार चिडते व अजिंक्यला एक जोराचा धक्का देते. त्या धक्यामुळे अजिंक्य समोरच्या भिंतीवर जावून आदळतो व प्रार्थना एक मोठी किंकाळी फोडते व तिचे शरीर हवेत उचलले जाते. ती आत्मा आपल्या असुरी आवाजात अजिंक्यला धमकी देते, “तू जर आता मला शरीरसुख दिले नाही तर मी या शरीराचे हाल - हाल करेन व या मुलीला ठार मारेन.’ त्याचबरोबर प्रार्थनाच्या हातांची नखे मोठी होतात.