सात दिवस आणि सहा रात्री भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ एप्रिल २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ३ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 3 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ३

“आपण येथील काही ठिकाणे पाहायला गेलो व तिथून आल्यापासून प्रार्थना अशी वागू लागली आहे. हे गाईज्‌, रागवू नका थोड‍ं स्पष्ट बोलते. प्रार्थनाच्या बाबतीत काही भूतप्रेतांचा त्रास तर नाही ना घडत.”विवेक नेहाला यावर रागवून म्हणतो, “शट आप नेहा, व्हॉट आर यू सेयिंग, ही वेळ आहे का हे सर्व बोलायची.” किरण विवेकला म्हणतो, “नाही विवेक मला नेहा बोलते ते खरे वाटत आहे.” विवेक यावर वैतागून म्हणतो,“वा! काय मित्र भेटले आहेत आपल्याला.”अजिंक्य नेहाला सौम्य आवाजात म्हणतो, नेहा माझा या गोष्टींवर विश्वास नाही.

मग ते सर्वजण ब्रेकफास्ट करायला जातात. प्रार्थना त्यांना म्हणते,“अरे, केव्हाची मी इथे तुमची वाट पाहत आहे.” ते सर्वजण तिला अगदी सावधपणे पाहत असतात. त्यांची ही अवस्था पाहून प्रार्थना त्यांना म्हणते, “अरे, काय पाहता मला तुम्ही असे.” यावर ते चारही जण भानावर येतात व ब्रेकफास्ट करून उरलेले पिकनिक पॉईंट्स पाहायला बाहेर पडतात. ते लॉजपासून थोड्या अंतरावर बाहेर येतात त्याचवेळी प्रार्थनाच्या शरीरातील अतृप्त स्त्री आत्मा पुन्हा जागृत होते. तिची कामेच्छा पुन्हा एकदा बाहेर येते आणि ती प्रार्थनाकरवी पूर्ण करवून घेण्यासाठी तिच्याकडून एक नाटक करवून घेते. अचानक प्रार्थनाचा पाय मुरगळतो व ती खाली बसते ती अजिंक्यला म्हणते, “आऊच! अजिंक्य माझा पाय खूप दुखत आहे रे. मी आणखी नाही चालू शकत. प्लीज मला रूमवर घेवून चल.” तिचा पाय खराखुरा मुरगळलेला असतो.


सात दिवस आणि सहा रात्री - कथेचे सर्व भाग