सात दिवस आणि सहा रात्री भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ एप्रिल २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ३ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 3 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ३

दिवस उजाडतो. अजिंक्य पलंगावर पडून असतो. त्याची अवस्था फार बिकट झालेली असते. तो शरीराने पूर्ण थकलेला असतो. प्रार्थनाची न संपणारी, न शांत होणारी कामेच्छा अनुभवून तो अचंबित झालेला असतो. विवेक, किरण व नेहा त्या रूममध्ये येतात अजिंक्यला असे निपचीत पडलेला पाहून किरण व विवेक त्याच्या जवळ जाऊन त्याला जागे करतात. नेहा अजिंक्यला प्रार्थनाबद्दल विचारते. तो काहीही न बोलता फक्त बाथरूमकडे बोट दाखवतो. बाथरूमचे दार उघडून प्रार्थना बाहेर येते. ती नेहमीपेक्षा फार आनंदित व उत्तेजित झालेली असते. ती तिथे आलेल्या सर्वांशी बोलायला लागते. काल आपण आपल्या मित्रांशी कसे वागलो आहोत याचा तिला जरा देखील थांगपत्ता नसतो. ती सर्वांना अगदीच कॅज्यूअली पद्धतीने म्हणते, “चला, आपण ब्रेकफास्ट करू व उरलेले स्पॉट्स पाहू.” पण ते सर्वजण संदिग्ध अवस्थेमध्ये असतात. प्रार्थना त्यांना पुन्हा एकदा ‘चला’ असे म्हणते. नेहा तिला ‘तू हो पुढे, आम्ही येतो’ असे म्हणून कटवते. प्रार्थना तिथून गेल्यावर विवेक अजिंक्यला धीर देत त्याच्या अवस्थेबाबत त्याला विचारतो.

अजिंक्य त्या सर्वांना रात्रीचा घडलेला प्रकार सांगतो. ते ऐकूण तिघेही हबकतात. नेहा अजिंक्यला म्हणते, “अजिंक्य, इफ यू डोण्ट माईंड. आम्ही काल रात्रभर या गोष्टींचा विचार करत होतो व तू सांगितलेली घटना आणि प्रार्थनाचे बिहेविअर पाहता या सर्व घटना नॉर्मल माणसाच्या हातून घडणार्‍या नाहीत.” विवेक तिला विचारतो, “म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुला? प्रार्थना अ‍ॅबनॉर्मल आहे?” यावर नेहा म्हणते, “नाही. मला तसे म्हणायचे नाही. म्हणजे पाहा ना या आधी अशी वागली आहे का प्रार्थना आपल्याशी.”