सात दिवस आणि सहा रात्री भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ एप्रिल २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग ३ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 3 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग ३

प्रार्थनाने आज संपूर्ण अंगावर लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला असतो. तिची केशभूषा अत्यंत सुंदर असते. तिच्या हातात एक केक असतो. ती पूर्वीपेक्षा फार सुंदर व रोमॅंटिक दिसत असते. तिच्या डोळ्यात एक प्रकारची वासना दिसत असते. ती अजिंक्यजवळ येते. तो तिला काही विचारणार इतक्यात ती त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवते व त्याच्या कानात म्हणते,“शूऽऽऽ आज काहीच बोलू नकोस. आजच्या रात्री आपल्याला लव्ह रिलेशनशीप मध्ये येऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत व सेलिब्रेट करायला आपण या सायलेंट व्हॅली परिसरात आलेलो आहोत.” असे म्हणून ती त्याच्या समोर केक धरते व त्याला कट करायला सांगते. अजिंक्य केक कट करतो प्रार्थना तो कट झालेला पीस आपल्या तोंडात धरते व तशीच अजिंक्यला घेवून पलंगावर पडते. तिथे त्यांचा धूंद प्रणय सुरू होतो. प्रार्थनाच्या शरीरात शिरलेली ती अतृप्त शक्ती एक स्त्री आत्मा असते व ती आपली अतृप्त कामेच्छा अजिंक्यकडून पूर्ण करवून घेते. रात्रभर त्यांचा धुंद प्रणय सुरू असतो. ती अतृप्त स्त्री आत्मा प्रार्थनाच्या शरीराचा वापर करून अजिंक्यकडून आपल्या सर्व प्रकारच्या कामेच्छा पूर्ण करवून घेते.