सात दिवस आणि सहा रात्री भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ मार्च २०१८
सात दिवस आणि सहा रात्री भाग १ - मराठी कथा | Seven Days And Six Nights Part 1 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री भाग १

यावर नेहा ‘वॉव’ असे म्हणत टाळ्या वाजवते. किरण मोठयाने ओरडून आनंद साजरा करतो. विवेक त्यांच्या जवळ जातो व त्यांना म्हणतो, ‘काय यार, तुम्ही दोघे नेहमी रूसवे फुगवे करता व आम्हाला बोअर करता. एनिव्हे सर्व काही ठिक होईल’ असे म्हणून तो सुटकेचा निश्वास सोडतो. नेहा म्हणते, ‘अरे, आता दोन दिवसांवर तुमची ‘लव्ह अ‍ॅनिव्हर्सरी’ आली आहे व या अ‍ॅनिव्हर्सरी निमित्त व कॉलेजला ख्रिसमसची सुटी असलेने आपण नेहमीच्या रूटिनमध्ये बदल करणेसाठी आपण सर्वजण कुठेतरी बाहेर ट्रिपला जावूया. विवेक व किरणला नेहाची कल्पना फार आवडते.

किरण म्हणतो, पण जायचे कुठे? या प्रश्नावर बर्‍याच वेळेपासून शांत व इनोसंट असलेल्या प्रार्थनाच्या तोंडून ‘सायलेंट व्हॅली’ या केरळ राज्यातील एका पर्यटन स्थळाचे नाव बाहेर येते. ते ठिकाण सर्वांना पसंत पडते व ते सर्वजण अजिंक्य व प्रार्थनाच्या ‘लव्ह अ‍ॅनिव्हर्सरी’ च्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या घरातील मंडळींची परवानगी घेऊन पहाटे पाच वाजता नाशिकमधून सायलेंट व्हॅली या पिकनिक पॉईंटकडे रवाना होतात. प्रवासी वाहन म्हणून अजिंक्यची जीप असते. तसा नाशिक ते सायलेंट व्हॅली हा प्रवास बावीस तासांचा असतो. ते तिघेही आलटून पालटून ड्रायव्हिंग करत असतात. आता ते मुंबई - गोवा महामार्गावर असतात व यांची ही ट्रिप ‘सहा दिवस आणि सात रात्रींची’ असते. त्यांना मार्गात कोकणचे नयनरम्य सौंदर्य पाहावयास मिळते. प्रवासात त्यांची मजामस्ती सुरू असते. एकमेकांचे फोटो काढणे, सेल्फी काढणे इ. प्रकार सुरू असतात. प्रार्थनाही अजिंक्यचा हात हाती घेऊन त्याच्या खांद्यावर डोके ठेवून निषचित पडलेली असते.

आत्तापर्यंत आपण पाहिले कि नाशिकमधील एक पाच मित्र - मैत्रिणींचा ग्रुप कॉलेजला सुट्टी असलेने व अजिंक्य आणि प्रार्थनाचे हरवलेले प्रेम परत मिळविण्यासाठी केरळ मधील हिल स्टेशन सायलेंट व्हॅलीकडे सहा दिवस मजामस्ती व त्या दोघांची लव्ह अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी जातात. पण हि ट्रिप त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटनी देणारी ठरते. या पिकनिकमध्ये त्यांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवयाला मिळतात व इथेच त्यांना मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत कळते व त्यांची सहा दिवसांची पिकनिक ‘सात दिवस सहा रात्रींची’ कशी होते हे आता पाहुयात...