सप्तपदी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१६

सप्तपदी - मराठी कथा | Saptapadi - Marathi Katha - Page 22

अस्मिता पेपर मध्ये तोंड लपवुन हमसुन हमसुन रडत होती. तिच्या आईनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला तशी ती त्यांना बिलगली आणि तिने हंबरडा फोडला. दुःखाचा आवेग थोडा कमी झाल्यावर ती वामनरावांना म्हणाली, “आज मी विधवा झाले बाबा! मला आनंदपासुन सुटका हवी होती पण अशी नव्हे. भलेही आमचे लग्न देवळात झाले होते त्यावर कायद्याची मोहर उमटली नव्हती पण तो होता तर माझा नवराच ना? (वामनरावांचा फोन सुरूच असल्यामुळे अस्मिताच्या या वाक्याने महादेवचे कान टवकारले.) मी त्याला मनापासुन आपले मानले होते. तुम्ही किंवा महादेवने तर हे केले नाही ना?” त्यावर वामनराव जवळ जवळ ओरडलेच, “अस्मिता! तु काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? ते तुला तरी कळतंय का? जावई कितीही नालायक असला तरी कोणता बाप आपल्या पोरीला विधवा बनवेल? मी काय किंवा महादेव काय कोणीही हे असले काम करू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेव पोरी, तुझ्यासारखे आम्हीही थोड्या वेळापुर्वी हे पेपरात वाचले. हे कोणी केले ते आम्हाला खरंच माहित नाही. पण जे घडते ते चांगल्यासाठीच. त्याला एक वाईट स्वप्न समजुन विसरण्यातच तुझी भलाई आहे. यावेळी तरी माझे ऐक, तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. विसर सगळे आणि पुढे चल. अजुन सगळे आयुष्य पडलंय तुझ्यासमोर.” थोडे दिवस जाऊदेत. तुझा रिझल्ट लागला की तु ठरल्याप्रमाणे सी.ए.ला ऍडमिशन घे. अभ्यास सुरु झाला की हळुहळु हे सगळे विसरशील. योग्य वेळ आली की आपण तुझ्या आवडीचा एखादा चांगला मुलगा बघु आणि तुझे थाटामाटात लग्न लावुन देऊ. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी सदैव आहोतच, तु फक्त या सगळ्यातुन लवकरात लवकर बाहेर पड. रडत घालवण्यासाठी आयुष्य खुप मोठे आहे बाळा. हसतमुखाने जग मग बघ आयुष्य किती सुंदर वाटले ते!.“ एवढे बोलून वामनराव सापत्निक अस्मिताच्या रूममधून बाहेर पडले. (वामनरावांकरवी अस्मितांचे मन कसे वळवायचे याचा विचार करत महादेवने फोन कट केला.) आणि अस्मिता आनंदच्या आठवणीत भुतकाळात हरवली.

आनंदच्या मृत्यूनंतर अस्मिताच्या आयुष्यात खरंच सुख येते का? आनंदच्या खुन्यांचा शोध लागतो का? आनंदचा मृत्यू म्हणजे अस्मिताची सुटका ठरते की ती आगीतुन फुफाट्यात सापडते. महादेवला ती आपल्या आयुष्यात स्थान देते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी वाचा सप्तपदी कथेचा उत्तरार्ध.