रमेचं लग्न

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ नोव्हेंबर २०१७

रमेचं लग्न - मराठी कथा | Ramecha Lagna - Marathi Katha

रमेच आज लग्न आहे. डोळ्यातून अथक अश्रू वाहत आहेत कसले? आनंदाचे फार मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचे ? माहिती नाही गौरी हार पूजताना नकळत भूतकाळात ओढली गेली.

एम.बी.ए ची हुशार विद्यार्थिनी असलेल्या रमेला खूप खूप शिकायचे होते. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. परिस्थिती बेताची असूनही आई बाबांनी तिला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आता तिला जीव तोड मेहनत करून ते स्वप्न पूर्ण करायचं होत. पण दैवाला जणू मंजूर नव्हतं. त्या दिवशी लेक्चर जरा जास्तच लांबल. बापरे आता घरी जाई पर्यंत रात्रीचे ११ तरी वाजतील आपल्या परिसरात दिवे सुद्धा नसतात किती वेळा. आई बाबांना काळजी लागून राहील म्हणून तिने मेसेज पाठवला स्टेशनवर उतरली तेव्हा ११ वाजून गेले होते रिक्षाने एकटीच नको त्या पेक्षा चालत जाऊ असा विचार करून भरभर चालू लागली. हळू-हळू रस्ता सुनसान होत गेला. तेव्हढ्यात मागून दोन-तीन दारुडे तिच्या मागे चालत आले एखाद्या श्वापदाने भक्षावर झडप घालावी तसे तिघेही तिच्यावर तुटून पडले. पुढे काय झाले माहिती नाही.

शुद्ध आली तेव्हा हॉस्पिटल मध्ये आहोत हे लक्षात आले आणि कालचा प्रसंग आठवला. आजू बाजूला डॉक्टर, मीडियाची माणसं एका मागून एक प्रश्न विचारत होती. आई-बाबा सुन्न होऊन बसले होते.

दिनेश आज उशीराच उठला टी.व्ही लावला तर सगळ्या वाहिण्यानवर हीच बातमी. दिनेश ताडकन उठला त्याला कालचा प्रसंग आठवला त्याने अशोक आणि शामने केलेले कृत्य आठवले समोर त्या मुलीचा वेदनेने कळवळणारा चेहेरा दाखवत होते. वासना माणसाला पशु बनवते कुठे जातात संस्कार ? काय करून बसलो आपण. आपल्याला सुद्धा बहिण आहे हे विसरलो आपण. तो हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागला नगरपालिकेच्या हॉस्पिटल जवळ पोचला तिच्या पलंगाजवळ गर्दी होती तिचा ओझरता चेहेरा पहिला आणि जीव कळवळला.

दिनेश रोज येत होता रमेसाठी काहीतरी करावं वाटत होतं पण सुचत नव्हतं. त्यातच तिला एड्स ची लागण झाल्याचं डॉक्टर कडून कळलं. रमा आणि तिचे आई वडील कोलमडून गेले तिला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला दिनेश त्यांच्या मागून घरापर्यंत गेला. काही निश्चय करून घरात गेला म्हणाला आई-बाबा मला बोलायचंय तुमच्याशी “कशी आहे रमा ? ते म्हणाले जिवंत आहे” असं का बोलता बाबा “मग काय म्हणू ? तिने न केलेल्या अपराधाची शिक्षा ती भोगते आहे भोगणार आहे. आम्ही आहोत तो पर्यंत ठीक आमच्या माघारी कोण देणार तिला आधार ?” दिनेश म्हणाला बाबा मी रमेशी लग्न करीन आत्ता आज. त्याने सगळी हकीकत त्यांना सांगितली.

रमेने तिच्या आई बाबांनी विचार केला देशात असे अनेक बलात्कार होत असतात पण किती जणांना पश्चात्ताप होतो ? आणि किती जण प्रायश्चित्त घेऊ इच्छितात ? रमेला समाजात मान परत मिळवून देत असेल तर काय हरकत आहे ? चूक तर त्याने केली आहे आणि त्याला कबुल पण आहे.

आज रमेचं लग्न आहे या बर का तिला आशिर्वाद द्यायला.