प्रतिशोध

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० ऑगस्ट २०१५

प्रतिशोध - मराठी कथा | Pratishodh - Marathi Katha - Page 4

आपल्या मुलाच्या आत्म्याला पाहून भगवानदासांचे डोळे भरले. आत्मारूपी गोपाळरावांनी भगवानदासांची माफी मागितली आणि मुक्त केल्याबद्दल बाबाचे आभार मानुन ते गायब झाले.

आता काय करावे असा विचार करत असताना त्या बाबाची भेट घ्यावी असे महादेवने भगवानदासांना सुचवले. सात्विकच्या कबुलीजबाबात त्याने दिलेल्या बाबाच्या पत्त्यावर भगवानदास, महादेव इन्स्पेक्टर सोबत पोहोचले. दरवाजा ठोठावताच बाबांच्या मदतनिसाने दरवाजा उघडला. बाबा बद्दल चौकशी करताच तो आढेवेढे घेऊ लागला. बाबा वगैरे कोणी इथे राहत नसल्याचे सांगुन त्याने खांदे वर केले. तो सरळ शब्दात ऐकत नाही हे लक्षात येताच इन्स्पेक्टर जाधवांनी त्याची मानगुट धरून आपल्या जवळील पिस्तुल त्याच्या डोक्याला लावली त्याबरोबर त्याने चुपचाप गुप्त तळघरातील खोलीत त्या तिघांना नेले. पिस्तुलाच्या नळीवर आपल्या मदतनीसाला आणलेले पाहून तो बाबा प्रचंड संतापला पण इन्स्पेक्टर जाधवांना सोबत पाहताच तो नरम झाला. भगवानदासांनी त्या बाबाला आपल्या मुलाच्या आत्म्यास बंधनमुक्त करुन त्याला मुक्ती मिळवून देण्यास विनवले. तेव्हा ‘त्यासाठी बराच खर्च करावा लागेल आणि आत्ता आपण व्यस्त असुन पुढच्या अमावस्येला या’ असे सांगुन उडवून लावले. इन्स्पेक्टर जाधवांनी जारण मारण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्याची भिती घालत आपला पोलिसी खाक्या दाखवताच तो सुतासारखा सरळ आला. त्याने गोपाळरावांच्या आत्म्यास बंधनमुक्त करण्याच्या विधीची तयारी करण्यास आपल्या मदतनीसाला सांगितले.

अर्ध्या एक तासात त्याने सर्व तयारी करुन बाबाला तसा इशारा केला. अग्नीकुंडात अग्नी प्रज्वलित करून त्याने प्राणरक्षा मंत्र म्हणावयास सुरवात केली त्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांची तो आहुती देऊ लागला. त्यानंतर त्याने हाडांपासून एक रिंगण बनवले. एका द्रोणात ठेवलेले चिताभस्म घेऊन त्याने त्या रिंगणात एक चौकोन बनवला. आता त्या चौकोनात एक सरळ आणि एक उलटा त्रिकोण बनवून तयार झालेल्या पंचकोनात एक मानवी कवटी ठेवली आणि उरलेल्या पाच त्रिकोणात पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तु जसे अग्नीसाठी निखारा, पृथ्वीसाठी माती, पाण्यासाठी एका करवंटीत पाणी, वायुसाठी पेटती उदबत्ती ठेवली, मात्र आकाशासाठी त्याने काहीच ठेवले नाही कारण ते अनंत आहे अमर्याद आहे. एका धाग्याची दोन्ही टोके एकत्र बांधुन एक गाठ मारली आणि ती रिंग त्या कवटीवर ठेऊन त्यावर हळद कुंकु टाकुन तो गोपाळरावांच्या प्रेतात्म्याचे आवाहन करू लागला. त्याचे धीरगंभीर स्वरातील मंत्र वातावरणातील गंभीरता वाढवू लागले. एकंदर सर्वांनाच तिथे जडपणा जाणवू लागला होता. इन्स्पेक्टर जाधवांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता पण भगवानदासांनी त्यांना भरपूर पैसे चारले असल्यामुळे ते निमुटपणे सर्व तमाशा पाहात होते.

बाबाने पंचमहाभूतांना आवाहन करताच त्रिकोणात ठेवलेल्या वस्तु हवेत अधांतरी तरंगु लागल्या आणि आता त्या कवटी भोवती वेगाने फिरू लागल्या. त्याबरोबर तो धागा त्या कवटी भोवती आवळला गेला. ते पाहुन जाधवांसह सर्वांनाच खुप भितीयुक्त आश्चर्य वाटले. इतक्यात हवेच्या आवागमनासाठी केलेल्या छतावरील रचनेतून त्या खोलीत प्रवेश करणाऱ्या एका पांढरट आकृतीकडे महादेवने भगवानदासांचे लक्ष्य वेधले. हळुहळु तरंगत ती आकृती त्या बाबासमोर येऊन स्थिर झाली. कवटी भोवती अधांतरी गोल फिरणाऱ्या त्या वस्तु आता त्या आकृती भोवती वेगात फिरू लागल्या. तिला पाहताच त्या बाबाने पंचमहाभुतांना त्या आत्म्यास मुक्त करण्यास सांगणारे मंत्र म्हणण्यास सुरवात केली. मंत्रोच्चार पुर्ण होताच एक एक करुन त्या सर्व वस्तु तिथुन गायब झाल्या आणि त्या आत्म्याने पंचकोनात ठेवलेल्या कवटीमधे प्रवेश केला आणि त्याबरोबर ती कवटी हलु लागली. बाबाने आत्माबंधनमुक्ती मंत्र म्हणत त्या कवटीवर चिताभस्म फेकले त्या बरोबर तो धागा जळून गेला आणि ती कवटी हवेत तरंगु लागली. बाबाने त्या आत्म्यास ‘तु आता माझ्या बंधनातुन मुक्त आहेस’ असे सांगताच ती कवटी परत त्या पंचकोनात जाऊन स्थिर झाली आणि त्यातुन तो पांढरट पारदर्शी आत्मा बाहेर पडुन भगवानदासांसमोर येऊन तरंगु लागला. हळुहळु त्याला गोपाळरावांच्या शरीराचा आकार येऊ लागला. आपल्या मुलाच्या आत्म्याला पाहून भगवानदासांचे डोळे भरले. आत्मारूपी गोपाळरावांनी भगवानदासांची माफी मागितली आणि मुक्त केल्याबद्दल बाबाचे आभार मानुन ते गायब झाले. बाबाने सांगितले की गोपाळरावांचा आत्मा त्याच्या बंधनातुन मुक्त झालाय पण त्याची मुक्ती तेव्हाच होईल ज्या वेळी त्याची अतृप्त ईच्छा पुर्ण होईल.