मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ४ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 4 - Marathi Katha - Page 6

श्रीनिवास अमोलला म्हणाला, “आत्ता आले माझ्या ध्यानात. कनिष्कच्या आत्म्याला या आरशात कैद नव्हते केले तर माझ्या पुर्वजांनी त्या आरशाद्वारे आत्म्यांच्या जगाशी मर्त्य जगाला जोडले. नंतर मंत्राद्वारे तो आरसारूपी दरवाजा उघडला आणि कनिष्कला मर्त्य जगातून आत्म्यांच्या जगात जाण्यास भाग पाडले. त्या मंत्राने केवळ तो दरवाजा उघडतो. आरशावर लिहिलेला मंत्र हा आत्म्यांच्या जगाचा दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी ठेवलेले परवलीचे वाक्य आहे आहे.”

आपल्या अतृप्त इच्छांमुळे तो सदैव या मर्त्य जगात येण्यासाठी संधीच्या शोधात राहणार हे वेळीच ओळखुन, “जोपर्यंत ते त्याचा पुरता बंदोबस्त करत नाहीत तोपर्यंत हा आरसा इतर कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.” असे माझ्या पुर्वजांनी राजा यशवर्धनाला सांगितल्याने आपसुकच त्या आरशाच्या संरक्षणाची जवाबदारी राजाकडून आमच्या कुटुंबावर सोपवली गेली.

आमच्या पूर्वजांखेरीज त्यावेळी ती जवाबदारी पार पाडू शकेल असे कोणीच नव्हते. त्यामुळे राजाला तो निर्णय घेणे अपरिहार्य होते. इतर कोणी कोणत्याही उद्देशाने तो मंत्र म्हणुन आत्म्यांच्या जगाचे पोर्टल उघडू नये यासाठी हा सगळा प्रपंच करावा लागला होता. त्या श्लोकाचा अर्थ एवढाच आहे की मर्त्य जगाचा आत्म्याच्या जगाशी संपर्क प्रस्थापित होऊ दे. आणि दुसऱ्या श्लोकाचा अर्थ हा आहे की मर्त्य जगाचा आत्म्यांच्या जगाशी संपर्क बंद होऊ दे.

कनिष्कने गोपाळला टार्गेट करून प्रियाकडून पहिला मंत्र म्हणवून घेतला आणि आत्म्यांच्या जगाचे पोर्टल उघडले. कनिष्कच्या मर्त्य जगात येण्याचा रस्ता सुकर झालाच पण कनिष्क पाठोपाठ इतरही अतृप्त आत्मे त्या पोर्टल मधुन मर्त्य जगात दाखल झाले आहेत त्यामुळेच ई.एम.एफ रीडर वर मला तसे संकेत मिळाले. तेव्हाच मला डाऊट आला की प्रियाच्या रूममध्ये एक नाही अनेक अमानवीय शक्ती उपस्थित असाव्यात. सुशीलाबाईंच्या शरीराला सोडून जेव्हा कनिष्कच्या आत्मा मला धक्का मारून गेला तेव्हा तो त्या आरशात शिरला असावा. म्हणुनच त्याची रिडिंग्ज मला नंतर मिळाली नाहीत. पण इतर आत्म्यांचे अस्तित्व दाखवणारी रिडिंग्ज मात्र मिळाली.

आपल्याला कनिष्कच्या बंदोबस्त करावा लागेलच पण त्याच बरोबर इतर वाईट आत्म्यांना त्या पोर्टलचा सुगावा लागण्याआधीच त्या जगातून या जगात आलेल्या पाहुण्यांना घरचा रस्ता दाखवावा लागेल व ते पोर्टल नष्ट करावे लागेल. त्या आरशामागील कप्प्यात असलेले भुर्जपत्र आम्हाला तिथे सापडले नाही. एकतर इतक्या वर्षांच्या कालावधीत ते नष्ट झाले असावे किंवा कनिष्कने आरशातून मर्त्य जगात आल्यावर स्वतः ते नष्ट केले असावे. माझ्या वडीलांच्या सांगण्यानुसार त्यामध्ये “आरश्यावरील श्लोक वाचल्यास अनर्थ घडेल त्यामुळे वाचु नये” अशा आशयाचा काही तरी मॅटर होता.

“तो गेल्यामुळे आपल्याला काहीच फरक पडणार नाही कारण घडायचे ते घडून गेले आहे. तुम्ही प्रियाला घेऊन या, तोपर्यंत मी कनिष्कच्या पाठवणीच्या तयारीला लागतो.” श्रीनिवासने असे म्हणताच अमोल आणि गोपाळ वाड्याकडे जायला निघाले. सोबत श्रीनिवासने दिलेली रुद्राक्षांची माळ घ्यायला ते विसरले नाहीत. श्रीनिवासने गरज पडल्यास मदत व्हावी म्हणुन आपले दोन असिस्टंट्स रमेश आणि जयेश सुद्धा त्यांच्या सोबत पाठवले.

गोपाळ कडून सगळी हकीकत कळल्यावर श्रीनिवासला सर्व गोष्टींचा उलगडा होतो. तो त्याच्या पुर्वजांनी कनिष्कच्या बंदोबस्तासाठी केलेल्या उपाययोजनेला सोप्या शब्दात सांगतो. अमोल आणि गोपाळ श्रीनिवासच्या दोन असिस्टंट्सना सोबत घेऊन वाड्याकडे जायला निघतात.


मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - कथेचे सर्व भाग