मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 3 - Marathi Katha - Page 8

ते फोटो पाहताच त्याचे वडील खुप भावुक झाले. त्या आरशाचे रक्षण करणारी राजाध्यक्षांची शेवटची पिढी देवाव्रतांच्या खापर पणजोबांची होती. त्यानंतर त्या आरशाच्या रक्षणाची जवाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली होती. त्यांना तर तो आरसा पाहण्याचाही योग आला नव्हता. नकळत त्यांचे डोळे भरले.

त्यांच्या आसवांची टिपे त्यांच्या गालावरून ओघळत त्या मोबाईल मधील फोटोवर पडली, त्यांनी ती अलगद पुसली आणि तो फोटो झुम झाला. ते मोबाईल परत देणार इतक्यात त्यांना त्या फोटोत काहीतरी आढळले आणि देवव्रत राजाध्यक्षांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता पसरली. "काय झाले बाबा? तुम्हाला काही दिसले का त्या फोटोत?" श्रीनिवासने विचारले.

तेव्हा त्याचे वडील म्हणाले, “या फोटोला नीट बघ, त्या आरशाच्या खालच्या बाजूला हे काही काळे पट्टे उठलेले दिसत आहेत, ते डाग नाही तर ते वाईट आत्मे आहेत ज्यांना त्या आरशात शिरताना तू क्लिक केले आहेस. कानिष्क एकटा परत नाही आलाय, तर तो आपल्या सोबत इतर काही आत्मे पण घेऊन आलाय. तुला कानिष्क सोबत त्यांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे.”

“तो आरसा नष्ट न केल्यास त्यातुन अजुन काय काय बाहेर येईल याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. श्री, तुला खुप सावध राहणे गरजेचे आहे. जा यशस्वी हो. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.” “थँक यु बाबा, तुम्ही खुप मोलाची माहिती दिलीत. आता मी बघतो पुढे काय करायचे ते!” असे म्हणुन श्रीनिवास राजाध्यक्ष स्वतःशीच काही विचार करत सरदेशमुखांच्या बंगल्याकडे निघाला.

देवव्रत राजाध्यक्षांच्या लक्षात येते की केवळ कनिश्कच नव्हे तर इतर काही आत्मे त्या आरशाच्या माध्यमातून या जगात आलेले आहेत. ते श्रीनिवासला येऊ घातलेल्या संकटापासून सावध करतात. पुढील भागात वाचा, तो आरसा सरदेशमुख परिवाराकडे येण्यामागचे रहस्य आणि घडलेल्या सर्व घटनांचा श्रीनिवासने केलेला उलगडा.


मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - कथेचे सर्व भाग