मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग ३ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 3 - Marathi Katha - Page 5

मध्यरात्रीच्या सुमारास वातावरण अचानक थंड झाले, हुडहुडी भरून आल्यामुळे राणी रुपमतीला जाग आली आणि तिने अंगावर पांघरून ओढुन घेतले. थोड्यावेळाने आपले पांघरून उचलले गेले आहे आणि कोणीतरी खालुन वर सरकत असल्याचे तिला जाणवले. तिला तिच्या शरीरावर थंड स्पर्श जाणवु लागला. हळू हळू तिला आपल्या पुर्ण शरीरावर कोणाचे तरी हात फिरत असल्याचे जाणवु लागले. तिने आपल्या पतीकडे पहिले तर तो गाढ झोपी गेला होता.

मग हा स्पर्श कोणाचा? डोळ्याला तर कोणीच दिसत नाही? तिच्या मनात कनिष्कचा विचार आला आणि भीतीने ती थरथरू लागली. तिच्या कपाळावर घर्मबिंदु जमा होऊ लागले. तिने आपल्या पतीला हाक मारण्यासाठी तोंड उघडले पण आवाजच बाहेर पडला नाही. त्याला हाताने जागे करण्यासाठी तिने आपला हात हलवला तर तोही हलेना. त्यातच तिचे कपडे पायावरून वर सरकु लागले.

पुढे काय होणार याची तिला जाणीव झाली आणि तिने सर्व शक्ती एकवटुन आपल्या पतीला आवाज दिला, “महाराज, मला वाचवा.” तिच्या आवाजाने राजा खडबडुन जागा झाला. तसे तिच्या शरीरावरचा भार ओसरला. राजा यशवर्धन काही बोलणार इतक्यात हवेत उचलला गेला आणि दूर फेकला गेला. बेसावध असलेल्या राजाला काय झाले ते आधी कळलेच नाही. त्याने उठायचा प्रयत्न केला पण जणु त्याला साखळदंडांनी कोणीतरी जखडुन ठेवले होते, तो तसुभरही हलु शकला नाही. त्याने आगतिकपणे आपल्या पत्नीकडे पहिले.

पलंगावर बसलेल्या त्याच्या पत्नीला कोणत्यातरी अदृश्य शक्तीने जबरदस्तीने आडवे पाडले आणि तिचे कपडे आपोआप फाटू लागले. तिच्या अंगावर मारल्यासारखे वळ उठू लागले. कोणीही दिसत नसले तरी राणीच्या शरीरावर पडत असलेला दाब स्पष्ट दिसत होता. एक अदृश्य शक्ती राणीचे शोषण करत होती. ती शक्ती इतर कोणी नसुन कनिष्कचा आत्मा होता हे एव्हाना त्या दोघांच्याही लक्षात आले. मदतीसाठी राजाने मोठ्याने आरोळी ठोकली.

त्याचा आवाज ऐकुन हत्यारबंद विश्वासु सैनिक शयनकक्षाकडे धावले पण दरवाजे, खिडक्या इतक्या मजबुतीने बंद झाले की ते ठोठावण्यापलीकडे काहीच करू शकले नाहीत. शेवटी राणीच्या शरीरावरील सर्व वस्त्रे दूर झाली आणि कनिष्कने आपला बदला घेतला. राजाच्या आणि राणीच्या दोघांच्या डोळ्यातुन अविरत अश्रू वाहत होते. आणि कनिष्कचा आवाज शयनकक्षात घुमला, “यशवर्धन! मी मरताना म्हणालो होतो की मी परत येईन. तुला वचन दिल्याप्रमाणे तुझ्यासमोर मी तुझ्या पत्नीचा उपभोग घेतला आणि तु काहीही करू शकला नाहीस...”

“...आता हे रोज तुझ्या डोळ्यासमोर घडणार. मी रोज माझा बदला घेणार आणि तु एका सामान्य माणसासारखा केवळ असहाय्यपणे पाहण्यापलीकडे काहीही करू शकणार नाहीस.” त्याचे हे वाक्य ऐकायचा अवकाश राणी रुपमतीने उशीखाली असलेली कट्यार काढली आणि सरळ आपल्या छातीत खुपसली आणि ती पतिव्रता राणी खाली कोसळली. कट्यारीने थेट हृदयाचा वेध घेतल्याने राणी क्षणात मृत्युमुखी पडली.

मध्यरात्रीच्या सुमारास कनिष्कचा आत्मा राजा यशवर्धनाला आपल्या सामर्थ्याने जखडून ठेवतो आणि राणी रुपमतीचा उपभोग घेऊन आपला शब्द खरा करतो. राणी रूपमती आत्महत्या करते. कनिष्क तेवढ्यावरच थांबतो की आपले अत्याचार सुरु ठेवतो ते आता पुढे वाचूया...