मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग २ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 2 - Marathi Katha - Page 4

विचार करत करत श्रीनिवास त्या आरशापाशी आला आणि त्याला निरखून पाहू लागला. आरशामागे संस्कृत मध्ये लिहिलेले दोन श्लोक त्याला दिसले. त्या आरशाचे काही फोटो त्याने विविध अँगल मधुन काढून घेतले. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. कनिष्कने चक्क त्याचे नांव घेऊन हाक मारली होती. त्याने नकळत त्याला हिंट पण दिली होती की शेकडो वर्षांपुर्वी त्याच्या पुर्वजांनी कनिष्कला त्या आरश्यात बंदिस्त केले होते. म्हणजे कनिष्कचा बंदोबस्त केला जाऊ शकतो, पण कसा? बराच वेळ तो विचार करत होता आणि त्याला आठवले की लहान असताना जेव्हा तो आपल्या आजोबांकडून आपल्या पुर्वजांच्या साहसकथा ऐकत असे त्यावेळी एका कथेत त्याने ते नांव ऐकले होते.

आता आजोबा तर हयात नव्हते पण त्याच्या वडीलांकडून त्याला त्याबद्दल नक्कीच अधिक माहिती मिळाली असती. ती माहिती त्याला कनिष्कचा पुरता बंदोबस्त करण्यात उपयोगी पडली असती. तातडीने तो आपल्या घरी परतला. त्याचे वडील देवव्रत राजाध्यक्ष त्यावेळी आराम करत होते पण राजा कनिष्कचे नांव ऐकताच ते ताडकन उठून बसले. कनिष्क परत आलाय हे कळताच ते कमालीचे चिंताक्रांत झाले. आता काय हाहा:कार उडेल याच्या कल्पनेनेच त्यांना घाम फुटला. श्रीनिवास राजाध्यक्षने या आधी आपल्या वडीलांना कधीही इतके घाबरलेले पहिले नव्हते त्यामुळे हा प्रकार वाटतो तितका साधा नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याचे वडील राजा कनिष्क आणि राजा यशवर्धन यांची त्यांच्या आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीला ज्ञात होत आलेली कथा सांगु लागले.

कनिष्क बद्दल विचार करत असताना श्रीनिवासला आठवते की त्याच्या आजोबांनी सांगितलेल्या कथेत कनिष्कचा उल्लेख झालेला असतो. तो आपल्या वडीलांच्या कानावर कनिष्क मुक्त झाल्याची बातमी घालतो आणि ते प्रचंड हादरतात. पिढी दर पिढी ऐकत आलेली कथा ते सांगू लागतात...

पुढील भागात वाचा राणी रुपमतीवर वाईट नजर ठेवल्याबद्दल राजा यशवर्धनाने कनिष्कला दिलेली भयंकर शिक्षा आणि कनिष्कने त्याचा घेतलेला बदला याची रोमहर्षक कहाणी.


मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - कथेचे सर्व भाग