मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग २ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 2 - Marathi Katha

पुर्वार्ध - आपण पाहिले की, अशोक सरदेशमुख नावाचे एका अँटिक शॉपचे मालक आपल्या बेजवाबदार मुलाला सुधारण्याच्या प्रयत्नांत हार्ट अटॅकमुळे मरण पावतात. त्यांचा मुलगा आपल्या बहिणीसमवेत त्यांचा पिढीजात व्यवसाय सांभाळू लागतो. एका माणसाबरोबर अमोल एका आरशाचा व्यवहार करतो आणि तो आरसा आपल्या बहिणीला भेट देतो. त्या आरशात बंदिस्त असलेल्या एका वासनांध आत्म्याला ती अनावधानाने मुक्त करते आणि तो तिचे शोषण करू लागतो. पुढे चालु...

डॉ. कुलकर्णी या गेली कित्येक वर्ष त्यांच्या फॅमिली डॉक्टर होत्या. त्यांनी प्रियाला लहानाची मोठी होताना पहिले होते. त्यांच्या मनात प्रियाबद्दल खुप प्रेम होते. त्या तिला आपली मुलगीच मानत आणि सरदेशमुख परिवाराबद्दलही त्यांना खुप आपुलकी होती. सुशीलाबाईंचा फोन झाल्यावर त्या लगबगीने सरदेशमुखांच्या घरी पोहोचल्या. डॉक्टर येताच सुशिलाबाई त्यांना सोबत घेऊन प्रियाच्या रूमपाशी आल्या त्यांनी बराच वेळ प्रियाच्या रूमचे दार ठोठावले पण आतुन काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तसे सुशिलाबाई घाबऱ्या घुबऱ्या झाल्या. अमोल आणि काही घरगड्यानी मिळुन दारावर धडाका मारायला सुरवात केली पण तो मजबूत दरवाजा जरासुद्धा हलला नाही. थकुन ते थांबले आणि जणू दरवाजा उघडाच असल्यासारखा हलकेच उघडला गेला. सुशीलाबाईनी आत डोकावून पहिले आणि पलंगावर मृतवत पडलेल्या अनावृत्त प्रियाला पाहून त्यांचे काळीज गलबलले.

त्या पटकन आत गेल्या आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला. ब्लॅंकेटने त्यांनी प्रियाचा अनावृत्त देह झाकला आणि दरवाजा उघडला व डॉक्टरांना आत येण्यास सांगितले. त्यांच्या पाठोपाठ आत शिरू पाहणाऱ्या अमोलला त्यांनी दारातच अडवले आणि बाहेरच थांबण्यास सांगितले व दरवाजा लावला. प्रियाची अवस्था पाहून कुलकर्णी मॅडमही हादरल्या. तिची प्राथमिक तपासणी केल्यावर तिच्यावर पाशवी बलात्कार झाला असावा अशी शंका त्यांनी सुशीलाबाईंकडे व्यक्त केली आणि सखोल तपासणीसाठी प्रियाला क्लिनिकवर घेऊन जावे लागेल असे त्यांनी सांगताच सुशीलाबाई कमालीच्या हादरल्या. आपल्या मुलीच्या बाबतीत असे काही घडू शकेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.

“हे कसे शक्य आहे डॉक्टर? ती कालपासून घरीच आहे. दुपारी डोकं दुखतंय सांगून दुकानातून घरी आली. नंतर पुर्णवेळ आपल्या रुममध्येच होती आणि संध्याकाळी जेवायला बोलावले तेव्हा तिची अवस्था बघवत नव्हती आणि आता तर..” असे म्हणून सुशिलाबाई धाय मोकलून रडू लागल्या. कुलकर्णी मॅडमनी त्यांना सावरले. आपल्या आईच्या रडण्याचा आवाज ऐकून दरवाज्या पलीकडे असलेला अमोल हवालदिल झाला होता. आताच नक्की सांगता येत नाही पण प्रियाची अवस्था पाहता हे सगळे गेल्या चौवीस ते छत्तीस तासात घडले असावे असा माझा अंदाज आहे. वस्तुस्थिती मी तुम्हाला सखोल तपासणी केल्यावरच सांगु शकेन. आपल्याला प्रियाला लवकरात लवकर माझ्या क्लिनिकला घेऊन जावे लागेल. प्रियाला कपडे घालुन झाल्यावर त्यांनी दरवाजा उघडला आणि अमोलला आत बोलावले. “काय झालंय प्रियाला, डॉक्टर? आणि आई का रडतेय?” अमोलने काळजीने विचारले. “ते नंतर सांगते आधी प्रियाला घेऊन माझ्या क्लिनिकला चल,” असे म्हणत डॉक्टर कुलकर्णी अमोल सोबत प्रियाच्या पलंगापाशी पोहोचल्या.

अमोल प्रियाला उचलण्यासाठी हात लावणार इतक्यात एका जोराचा ठोसा अमोलच्या पोटात बसला आणि तो हवेत उडून दरवाज्यावर आदळला. त्या अनपेक्षित प्रकाराने सर्वच जण चक्रावले. पाठोपाठच चिडलेल्या कनिष्कचा आवाज त्यांच्या कानात शिरला. “प्रिया माझी आहे आणि तिला इतर कोणीही हात लावला तर जीवानिशी जाईल. होय, मीच उपभोग घेतला आहे तिचा! तुम्हीच काय, माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही.” यावर वेदनेने कळवळलेला अमोल म्हणाला, “कोण आहेस तु? दिसत का नाहीस?” “मी आहे राजा कनिष्क. मी तुमच्या मर्त्य जगातील नाही. मी कोणाला दिसावे हे माझ्या इच्छेवर अवलंबुन आहे. तुम्ही प्रियाचा नाद सोडा. ती आता तुमची राहिली नाही. येत्या अमावास्येला मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे.” कनिष्कचा आवाज रूममध्ये घुमत होता.

डॉक्टर कुलकर्णी प्रियाला तपासल्यावर तिच्यावर अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवतात. आणि सखोल तपासणीसाठी प्रियाला क्लिनिकवर घेऊन चलण्यास अमोलला सांगतात. अमोल प्रियाला हात लावताच कनिष्कच्या आत्मा त्याला मारहाण करतो आणि प्रियाला अमावास्येला सोबत घेऊन जाणार असल्याचे सांगतो. डॉक्टर कुलकर्णी प्रियाला वाचवण्यासाठी काय करतात ते पुढे वाचुया...