मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 9

मोठा आवाज झाल्यामुळे किचनमध्ये काम करत असलेल्या सुशीला बाईंनी प्रियाला आवाज दिला, “काय झाले ग प्रिया? का एवढी आदळ आपट करत आहेस?” त्यावर “काही नाही आई! पाय पायात अडकुन धडपडले. मी ठीक आहे.” असे प्रियाने उत्तर दिले. “मला आत्ता निघायला हवे, संध्याकाळी भेटु” असे म्हणुन प्रिया निघण्यासाठी वळली तसा तिच्या शरीराला कनिष्कच्या हातांचा विळखा पडला. त्यावर कनिष्कला समजावणीच्या सुरात ती म्हणाली, “जावेसे तर मला पण वाटत नाही पण जावे लागेल. हे आपले गुपित कोणाला कळू नये याची मी खबरदारी घेईन. मी संध्याकाळी लवकर येते मग आपण खुप गप्पा मारू; आणि प्रणय पण करू, पण आत्ता मला जाऊ द्या. प्लिज!” प्रियाच्या शब्दातली आर्जव कनिष्कला आवडली आणि त्याने तिच्या ओठांचे एक दीर्घ चुंबन घेऊन तिला मुक्त केले. एक गोड स्मित करून प्रिया आपल्या रूममधुन बाहेर पडली. ती भलतीच खुशीत होती. कनिष्क बरोबर केलेल्या धुंद प्रणयाच्या आठवणीने तिच्या शरीरावर रोमांच उभे राहत होते. डायनिंग टेबलवर अमोल आणि सुशीला बाई तिची वाट पाहत होते. प्रिया खुप खुश दिसत होती. तिच्या वागण्यातील बदल दोघांनाही जाणवला.

पटपट ब्रेकफास्ट करून अमोल आणि प्रिया दुकानात जायला निघाले. कारमध्ये बसल्या बसल्या प्रियाने पहिल्या मजल्यावर असलेल्या तिच्या रूमच्या खिडकीकडे पाहात हात हलवला आणि स्माईल केले तसे अमोलची नजर तिच्या रूमच्या खिडकीकडे गेली पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही. त्याने प्रियाकडे पहिले आणि परत खिडकीकडे पहिले. त्या खिडकीला लावलेला पडदा त्याला हलल्यासारखा वाटला. त्याने परत वळून प्रियाकडे पहिले तर ती आपल्याच तंद्रीत गालातल्या गालात हसत असल्याचे त्याला दिसले. आज हिला नक्की झालंय तरी काय? अशी विचित्र का वागते आहे? असे प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले पण त्याने, ‘असेल काही तरी, आपल्याला काय करायचे आहे?’ असे स्वतःशीच म्हणत ते विचार मनातुन उडवून लावले.

दिवसभर प्रिया आपल्याच धुंदीत होती. तिला राहून राहून कनिष्कची आठवण येत होती. कधी एकदा घरी जातेय असे तिला झाले होते. एका अमानवीय शक्तीसोबत प्रणय करण्याची कल्पनाच तिला रोमांचित करत होती. आता तिला ते धुंद क्षणही उपभोगता येणार होते आणि लग्न करून कोणा अनोळखी मुलाच्या तालावर नाचावेही लागणार नव्हते. तसेच दुकान आणि आपल्या कुटुंबीयांसोबत घराचीही काळजी घेता येणार होती. या सगळ्यात ती हे विसरली होती की जोपर्यंत सगळे बिनदिक्कत चालले आहे तो पर्यंत ठीक आहे. पण जर त्या अमानवीय शक्तीचे काही बिनसले तर तिची काय अवस्था होईल याचा विचार तिच्या मनात येतच नव्हता. कनिष्क काय चीज आहे हे तिला कुठे माहीत होते? ही तर सुरवात होती.

त्या दिवशी दुकानात विशेष गर्दी नव्हती त्यामुळे तब्येतीचा बहाणा करून ती लवकर घरी गेली. तिला लवकर घरी आल्याचे पाहून सुशीला बाईंनी काळजीने तिची विचारपूस केली. थोडं डोकं दुखतय, जरा विश्रांती घेतली की होईल बरे असे सांगुन प्रिया आपल्या रूममध्ये पळाली. “कनिष्क! मी आलेय” असे म्हणत ती कनिष्कची वाट पाहू लागली. तिला तिच्या मानेवर उष्ण श्वास जाणवला आणि पाठोपाठ कनिष्कचे शब्द तिच्या कानात शिरले, “किती उशीर लावलास? मी आता तुझ्या दुकानातच येणार होतो.” त्याबरोबर ती त्याला म्हणाली, “किती उतावीळ होताय. मी आले आहे ना? आणि तुम्ही दुकानात आलात तर आपले गुपित सर्वाना कळणार नाही का?” पुढच्याच क्षणाला कनिष्कने तिला उचलून पलंगावर ठेवले आणि ती त्याच्या मिठीत विरघळून गेली.

प्रियाच्या वागण्यातील बदल अमोलला चांगलाच जाणवतो पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. एका अमानवीय शक्ती बरोबर प्रणय करण्याच्या कल्पनेनेच प्रिया भारावलेली असते. डोके दुखीचे कारण सांगून प्रिया कनिष्कला भेटण्यासाठी घरी लवकर परतते. आधी सुखद वाटणारा प्रणय प्रियाला तसाच सुखद वाटतो का? की परिस्थिती एकदम बदलून जाते ते आता पुढे वाचुया...