मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 8

सकाळी प्रियाला थोडी उशीराच जाग आली. उठल्यावर ती आळोखे पिळोखे देत असताना तिला आपल्या शरीरामध्ये वेदना होत असल्याचे जाणवले. अंतर्वस्त्रावर सुकलेल्या रक्ताचे डाग पाहून ती हादरली. तिला रात्री पडलेले स्वप्न आठवले. स्वप्नाचा परिणाम शरीरावर एवढा कसा काय होईल असा विचार करत ती बाथरूम मध्ये आंघोळीस गेली. आंघोळीच्या वेळी साबण लावताना तिला थोड्या वेदना झाल्या त्यामुळे तिने चेक केले तर तिच्या गोऱ्या सुंदर शरीरावर काही ठिकाणी रक्त साकळल्यासारखे निळसर काळे डाग उमटले होते. आपण सहजच म्हणुन बोललेली गोष्ट खरंच तर नाही ना घडली? आपल्याला स्वप्नात जो तरुण दिसला होता तो रात्री खरच तर आला नव्हता ना? आणि त्यानेच तर हे केले नसावे ना? पण हे कसे शक्य आहे? की आपणच उत्तेजनेमध्ये स्वतःला दुखापत करून घेतली? विचार करून तिचे डोके गरगरू लागले. अचानक तिला तिच्या शरीरावर कोणाचा तरी स्पर्श जाणवू लागला. डोळ्याला तर कोणी दिसत नव्हते पण तिला तो स्पर्श व्यवस्थित जाणवला. हा भास तर नव्हे? आपल्याला नक्की होतंय तरी काय? असा विचार तिच्या मनात आला तोच तिला तिच्या मानेवर एक उष्ण उच्छवास जाणवला आणि तिचे सर्वांग शहारले.

अचानक तिला कोणीतरी मिठी मारल्याचे जाणवले आणि ती हादरली. तिला ओरडावेसे वाटत होते पण आवाजच फुटत नव्हता. पळून जावेसे वाटत होते पण पाय उचलत नव्हते. काही क्षणानंतर तिच्या लक्षात आले की ज्या गोष्टीचा विचार करून ती बेचैन झाली होती ती गोष्ट आदल्या रात्री तिच्या बाबतीत खरच घडली होती आणि आत्ताही घडत होती. त्या प्रकाराने आधी ती प्रचंड घाबरली पण हळू हळू तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलत गेले. तिला तो स्पर्श हवा हवासा वाटू लागला. मधेच आरशाकडे तिची नजर गेली डोळ्याला कोणीच दिसेना पण स्पर्श जाणवत होता. वळून पहिले तर तिला ती स्वप्नातील तरुणाच्या मिठीत असलेली दिसली. तिने पुन्हा आरशात पहिले पण कोणीच दिसेना. प्रिया पुन्हा शहारली पण ज्या सुखासाठी ती आसुसलेली होती ते भरभरून मिळत असल्यामुळे ती आपली सारासार विचार शक्ती हरवून बसली होती. कनिष्कची जादू प्रियाच्या मनावर पुरती चढल्यामुळे ती सर्व काही विसरून कामसुखाची परमोच्च शिखरे सर करत होती.

आंघोळ उरकून प्रिया बाहेर पडली. तिला प्रचंड थकवा जाणवत होता. तिचा अजुनही विश्वास बसत नव्हता की स्वप्नात पाहिलेले तिच्याबाबतीत प्रत्यक्षात घडत होते. एका अदृश्य शक्तीसोबत तिने कामसुख घेतले होते. आधी हा विचार तिला भयभीत करून गेला पण हळू हळू तिची भीती कमी झाली. तिलाही ते हवे असल्यामुळे ‘हे असेच घडत राहिले तर किती मजा येईल आणि कोणाला काही कळणारही नाही’ असा विचार तिच्या मनात आला. तो तरुण कोण आहे याची तिला उत्सुकता वाटू लागली. तिने कपडे बदलले आणि ती त्या आरशाजवळ आली. तिची नजर त्याला तिच्या रूममध्ये शोधु लागली. कोणीच न दिसल्यामुळे त्या अदृश्य शक्तीशी तिने बोलण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही कोण आहात? राजा यशवर्धन तर नव्हे” या तिच्या प्रश्नावर तिथे ठेवलेले चांदीचे भांडे आपोआप उडाले आणि जाऊन त्या आरशावर आदळले. त्या प्रकारामुळे प्रिया थोडी घाबरली आणि मागे मागे सरकत आपल्या पलंगावर जाऊन बसली.

तिची शंका खरी ठरली होती हे तिच्या ध्यानात आले आणि तिच्या अंगावर काटा आला. पण त्याचवेळी आपल्या तनमनात तिला एक वेगळीच उत्तेजना जाणवली. तिथे कोणाचे तरी अस्तित्व होते, पण कोणाचे? ज्याअर्थी तिच्या प्रश्नावर ते चांदीचे भांडे आरशावर जाऊन आदळले त्याअर्थी तो राजा यशवर्धन नव्हता. मग कोण होता? तिच्या मनात हा प्रश्न येतो न येतो तोच त्या आरशावर वाफ जमली आणि त्यावर अक्षरे उमटली. ‘कनिष्क’. ते पाहून प्रियाची भीड चेपली आणि उत्सुकता चाळवली. तिने पुढे विचारले, “माझ्या स्वप्नात आणि प्रत्यक्षात माझ्याशी प्रणय करणारे तुम्हीच आहात ना?” या तिच्या प्रश्नावर ‘होय’ अशी अक्षरे आरशावर उमटली. तुम्ही मला हानी तर पोहोचवणार नाही ना? असे तिने विचारताच ‘सहकार्य केल्यास नाही.’ असे वाक्य आरशावर उमटले. तुम्ही जीवंत आहात की मृत असे विचारताच मात्र राजा यशवर्धनाने आपली केलेली अवस्था आठवुन कनिष्क क्रोधीत झाला आणि उत्तराची वाट पाहत बसलेल्या प्रियासकट तिचा पलंग वेगाने जाऊन भिंतीवर आदळला.

प्रियाला सुरवातीला जे केवळ स्वप्न वाटते ते स्वप्न नसून सत्य असल्याचे लक्षात येते. कनिष्क अदृश्य रूपात पुन्हा एकदा तिचा उपभोग घेतो. आधी घाबरलेल्या प्रियाला नंतर ते आवडू लागते. पुढे प्रिया आणि कनिष्कच्या प्रणय असाच बिनदिक्कत सुरु राहतो का? प्रियाच्या वागण्यातील बदल घरच्यांच्या लक्षात येतो का ते आता पुढे वाचुया...