मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 7

संस्कृत मध्ये लिहिलेले ते श्लोक वाचायचे सोडुन ती त्या चोरकप्प्याला उघडण्यासाठी प्रयत्न करू लागली तसे कनिष्कचा आनंद नाहीसा हौऊन तो बेचैन झाला कारण त्या चोर कप्प्यात कनिष्कचे रहस्य लपले होते. जर ते रहस्य प्रियाला कळले तर ती मंत्र उच्चारणार नाही आणि कनिष्कला मुक्ती मिळणार नाही आणि मिळालीच तरी परत तो कैद व्हायची शक्यता होती. आता काय करावे या विचारात कनिष्क असतानाच प्रियाकडुन नकळत एक गुप्त कळ दाबली गेली आणि तो चोर कप्पा उघडला गेला. प्रियाला त्या कप्प्यात एक जिर्ण झालेले भुर्जपत्र (झाडाची पातळ साल, जिचा उपयोग कागदाचा शोध लागण्याअगोदर लिहिण्यासाठी केला जायचा) आढळले. अत्यंत सावधपणे तिने ते भुर्जपत्र बाहेर काढले आणि टेबलवर पसरले. तिला त्याच्यावर काही तरी लिहिले असल्याचे दिसले. आता आपली काही सुटका होत नाही, जे करायचे ते आत्ताच असा विचार कनिष्कने केला. कनिष्कच्या सुदैवाने ते भुर्जपत्र अत्यंत जिर्ण झाले होते आणि त्यावरील फुलांच्या रंगापासुन बनवलेली शाई खुपच पुसट झाली होती. त्यामुळे ते वाचण्यासाठी प्रियाला खुप प्रयत्न करावा लागत होता. इतक्यात कुठूनशी एक हवेची झुळूक आली आणि तिने ते भुर्जपत्र उडवले. अलगद तरंगत ते भुर्जपत्र जमीनीवर पडले. प्रिया ते उचलण्यासाठी वाकणार इतक्यात तो आरसा पुन्हा एकदा पुढे झुकला आणि प्रियाचे लक्ष पुन्हा त्या श्लोकांकडे गेले.

जमीनीवरील भुर्जपत्र तिने अलगद उचलले आणि टेबलवर ठेवले. आरशाविषयी जाणुन घेण्यासाठी उतावीळ झाल्यामुळे तिचा संय्यम सुटला, आणि ते भुर्जपत्र तिथेच ठेऊन ती आरश्याच्या मागे काय लिहिले आहे ते पाहण्यासाठी गेली. कनिष्कच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या. आता त्याची मुक्ती खरंच काही क्षणांवर येऊन ठेपली होती. शेवटी जे घडू नये तेच घडले, प्रियाने तो संस्कृत मधील पहिला श्लोक वाचला. आणि आरशावर लिहिलेल्या त्या पहिल्या श्लोकांची अक्षरे उजळून निघाली. ते पाहून प्रिया चक्रावून गेली. ती आरशाच्या पाठीमागे होती त्यामुळे तिला पुढे काय घडत आहे हे समजले नाही. श्लोक वाचुन झाल्यावर ती त्याचा अर्थ लावत असताना आरशाच्या काचेतील घनत्व नाहीसे होऊन ती प्रवाही बनली आणि त्यातुन अदृश्य रूपातील कनिष्कचा आत्मा बाहेर पडला. प्रयत्न करूनही तिला पहिल्या श्लोकाचा अर्थ न समजल्यामुळे तिने कंटाळून दुसरा श्लोक वाचलाच नाही आणि इतर काही खुणा दिसतात का हे ती पाहू लागली. पुढच्या क्षणाला ती काच पुर्ववत झाली.

कनिष्कचा आत्मा बाहेर पडताच त्या रूममधील वातावरण आणखीनच थंड झाले. थंड हवा प्रियाच्या शरीराला स्पर्शुन जाऊ लागली आणि प्रियाच्या शरीरावर थंडीने काटा येऊ लागला. तिचे डोळे मिटु लागले तसे त्या आरशावरील संस्कृत श्लोकांचा अर्थ लावायचे सोडून तिने लाईट बंद केला आणि ब्लॅंकेट अंगावर ओढून आपल्या पलंगावर झोपी गेली. ती झोपी जाताच कनिष्कने आपला कुटील हेतु साध्य करण्यासाठी एक चाल खेळली. त्याने त्या भुर्जपत्राकडे पाहताच त्याचे राखेत रूपांतर झाले आणि ती राख त्या रूममधील हवेत बेमालुमपणे मिसळून गेली. कनिष्कचे रहस्य आता कायम रहस्य बनुनच राहणार होते. यावेळी त्याला दीर्घकाळासाठी प्रियाचा उपभोग घ्यायचा होता त्यामुळे त्याने थोडे वेगळ्या मार्गाने ते प्रकरण हाताळायचे ठरवले. प्रियाला पुन्हा तेच स्वप्न पडले, ज्यात ती त्या देखण्या तरुणासोबत प्रणय करत होती. पुन्हा एकदा ती दचकुन जागी झाली.

त्या स्वप्नाने ती पुरती बेचैन झाली होती. तिच्या तारुण्यसुलभ भावना उफाळून येत होत्या. प्रियाच्या स्वप्नातला तो तरुण तिला डोळ्यासमोर दिसु लागला. ती त्याच्याकडे आकृष्ट होऊ लागली. नकळत तिच्या तोंडून निघाले, “स्वप्नात येऊन छळण्यापेक्षा आत्ता इथे येऊन मला आपल्या मिठीत घे ना!” आणि आपल्याच वाक्याने तिचा चेहरा लाजेने आरक्त झाला. उशीला आपल्या छातीशी कवटाळुन तिने एक उसासा सोडला आणि पुन्हा झोपी जायचा प्रयत्न करू लागली. पुन्हा तिला तेच स्वप्न पडले आणि ती त्या स्वप्नात हरवली. आपली चाल यशस्वी झाल्याचे लक्षात येताच कनिष्कचा आत्मा तिथे दृश्य स्वरूपात आला. प्रियाचे डोळे अलगद उघडले आणि तिला आपण स्वप्नातील तरुणाच्या मिठीत असल्याचे जाणवले. आपण स्वप्नातच आहोत असे वाटून तिने कनिष्कला आवेगाने मिठी मारली आणि कनिष्कने त्या रात्री अनेक वेळा प्रियाचा उपभोग घेऊन इतक्या वर्षांची आपली अतृप्त कामवासना पुर्ण करून घेतली.

कनिष्क आपल्या हुशारीने प्रियाकडून श्लोक म्हणवून घेतो आणि आरशाच्या कैदेतून मुक्त होतो. कनिष्कचे रहस्य लिहिलेले भुर्जपत्र तो चलाखीने नष्ट करतो. प्रियाला कामुक स्वप्ने पाडून तो तिचा उपभोग घेतो. सकाळी जाग आल्यावर रात्री नेमकं काय घडलंय हे लक्षात आल्यावर प्रियाची प्रतिक्रिया काय असते ते आता पुढे वाचुया...