मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 11

प्रियाची अवस्था पाहून अमोल आणि सुशिलाबाई दोघांनाही तिची काळजी वाटू लागली. त्यांनी तिला खोदून खोदून विचारले पण प्रियाने ताकास तूर लागू दिला नाही. कनिष्कने तिला तशी ताकीदच दिली होती. कसे बसे दोन घास खाऊन प्रिया उठली आणि परत आपल्या रूममध्ये जाऊ लागली तेव्हा सुशीला बाईंनी तिला अडवले, “प्रिया! मला सांग काय झालंय? तु अशी विचित्र का वागत आहेस? काय होतंय तुला? बरे वाटत नाही का? डॉक्टरला बोलावू?” अशा एक ना अनेक प्रश्नांचा त्या प्रियावर भडीमार करू लागल्या. यावर कसंनुसं हसत प्रिया म्हणाली, “अगं! खरंच काही झालेले नाही आहे. थोडी थकले आहे इतकेच. विश्रांती घेतली की होईल बरे. तु नको काळजी करुस” असे म्हणुन प्रिया जवळ जवळ लंगडतच आपल्या रूमकडे जाऊ लागली. “थांब प्रिया! आज मी तुझ्या सोबत तुझ्या रूममध्ये झोपायला येते, तुला काही दुखलं खुपलं तर माझी मदत होईल तुला आणि तसाही तुझ्या काळजीने माझा जीव टांगणीला लागुन राहील.” सुशिलाबाई म्हणाल्या.

त्यांच्या त्या वाक्याने प्रियाचा जीव एकदम घाबरा घुबरा झाला. कनिष्कला ते आवडले नसते. त्याने आपल्या आईला काही केले तर हा विचार मनात येताच प्रिया एकदम ओरडलीच, “नाही! नको. म्हणजे अगं! मी ठीक आहे. तु नको काळजी करुस”, आणि ती तोंड फिरवून जिना चढू लागली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अमोल आणि सुशिलाबाई पाहतच राहिले. “नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि त्याचा छडा लावलाच पाहिजे”, नकळत अमोलच्या तोंडून निघाले. सुशीलाबाईं त्याला दुजोरा देत म्हणाल्या, “उद्या सकाळीच आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलावून घेते. एका दिवसात माझ्या प्रियाची काय अवस्था झाली आहे! ती कसला त्रास होतोय काही सांगतही नाही, एकटीच सहन करतेय सगळे. मला तिची ही अवस्था पाहावत नाही.”

प्रियाला आपल्या रूममध्ये जाण्याच्या कल्पनेनेच कापरे भरले होते. कनिष्कचे अत्याचार सहन करणे आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होते. पण बिचारी करणार तरी काय? आत जावे तरी अडचण आणि न जावे तरी अडचण. ती कात्रीत सापडली होती. घरच्यांना काही अपाय होण्यापेक्षा जे काय व्हायचंय ते आपल्यालाच होऊ दे असा विचार करून तिने भीतभीतच आपल्या रूमचा दरवाजा उघडला. एका थंड हवेच्या झोताने तिचे स्वागत केले आणि काही कळायच्या आताच ती उचलली गेली आणि तरंगत तिच्या पलंगाच्या दिशेने जाऊ लागली. पाठोपाठ दरवाजा आपोआप बंद झाला. ती कनिष्कला विनंती करू लागली, “नको कनिष्क. प्लिज आत्ता नको. मी नाही सहन करू शकत. अशाने माझा जीव जाईल. दया कर. मी माणूस आहे, माझ्या शरीराला काही मर्यादा आहेत.” यावर कनिष्क निर्दयपणे म्हणाला, “तु मेलीस तर उत्तमच आहे मग मानवी शरीराच्या मर्यादा तुला लागु होणार नाहीत आणि आपण अखंड कामसुख उपभोगू शकु.”

प्रियाचे शरीर धाडकन तिच्या पलंगावर आदळले आणि कनिष्क तिच्यावर आरूढ झाला. रात्रभर त्याने कसलीच दया माया न दाखवता केवळ एका भोग्य वस्तुसारखा तिचा पाशवी उपभोग घेतला. त्या अत्याचारांनी गलितगात्र झालेली प्रिया आपल्या पलंगावर निचेष्ट पडली होती. तिच्या डोळ्यात ना कसल्या संवेदना होत्या ना तिच्या शरीराची कसली हालचाल होत होती. ती एका मृतदेहासारखी निश्चल पडली होती. तिला रडावेसे वाटत होते पण अश्रूच सुकले होते, ओरडावेसे वाटत होते पण आवाज साथ देत नव्हता. पळून जावेसे वाटत होते पण शरीर साथ देत नव्हते. ती केवळ एका निर्जीव बाहुलीसारखी पडून होती. शेवटी तृप्त झाल्यावर कनिष्कने तिला सोडले, आणि ती बेशुद्ध झाली.

प्रियाला कनिष्कने धमकी दिल्यामुळे ती आपल्या भावाला आणि आईला काहीच सांगत नाही. तिची तब्येत ठीक नाही असे वाटून सुशिलाबाई त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलवायचे ठरवतात. प्रिया कनिष्कला विरोध करायचा प्रयत्न करते पण कनिष्क तिला कसलीही दयामाया न दाखवता तिचा बळजबरीने उपभोग घेतंच राहतो.

पुढील भागात वाचा, प्रियाला तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टर कुलकर्णी एका पॅरानॉर्मल एक्सपर्टला प्रियाच्या मदतीसाठी बोलावतात आणि सुरु होते एक आध्यात्मिक तसेच तांत्रिक लढाई, प्रियाला त्या वासनांध आत्म्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी...


मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - कथेचे सर्व भाग